home page top 1

२०१९ मध्ये करण जोहर ‘लोकप्रिय’ दिग्दर्शक नं. १

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट निर्माता करण जोहर बॉलिवूडच्या लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांच्या यादीमध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर आहे. मागील सहा महिन्यामध्ये लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांच्या स्कोरमध्ये ट्रेंड्स इंडियाच्या इतिहासामध्ये करण जोहर सगळ्यात उत्कृष्ठ निर्माता असल्याचे समोर आले आहे.

या यादीनूसार, करण जोहर पहिल्या स्थानावर तर चित्रपट २.० चे दिग्दर्शक शंकर दूसऱ्या, फरहान अख्तर तिसऱ्या, रोहित शेट्टी चौथ्या आणि अनुराग कश्यप पाचव्या स्थानावर आहे. ही आकडेवारी अमेरिकेची मिडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाद्वारे प्रमाणित केली गेली आहे.

सिंबा, केसरी, कलंक आणि स्टुडंट ऑफ दि इयर – २ या चित्रपटांमुळे करण जोहर बॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्यांमध्ये सगळ्यात चर्चेत आहे. त्याचबरोबर करण जोहर यांचा ‘कॉफी विथ करण सीजन ६’ हा शो देखील प्रसिद्ध झाला आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीनुसार, व्हायरल न्यूज, न्यूजप्रिंट, डिजिटल, सोशल प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्समध्ये लोकप्रियतेच्या सगळ्या श्रेणीमध्ये करण १०० अंकासोबत प्रसिद्ध झाले होते. दक्षिण भारतीय चित्रपटाचे लोकप्रिय निर्माते शंकर ८९.१५ अंकाने लोकप्रियतेमध्ये दुसऱ्या स्थानावर, रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टार ‘२.०’ चे दिग्दर्शक शंकर, डिजीटल श्रेणीमध्ये ९३.०७ अंक, व्हायरल श्रेणीमध्ये १७ अंक आणि न्यूजप्रिंट श्रेणीमध्ये १०० अंकासोबत लोकप्रियतेच्या दुसऱ्या स्थानावर आहे.

लोकप्रियतामध्ये चित्रपट निर्माते फरहान अख्तर तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा चित्रपट ‘गली बॉय’ आणि वेबसीरीज ‘मेड इन हेवन’ च्या लोकप्रियतेसोबत ते तिसऱ्या स्थानावर आहे.

चित्रपट निर्माते रोहित शेट्टी ३०.२४ अंकासोबत चौथ्या स्थानावर आहे. त्यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट सिंबा आणि सगळ्यात जास्त टीआरपी मिळवलेला टिलीव्हिजन शो ‘खतरों के खिलाडी’ च्या यशामुळे रोहित शेट्टी चौथ्या स्थानावर आहे.

नेटफ्लिक्सची सगळ्यात लोकप्रिय वेब श्रृंखला ‘सैक्रेड गेम्स’ चे निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या या वेबसीरीजच्या दुसऱ्या पार्टसाठी खूप चर्चेमध्ये होते. यासोबतच ऋतिक रोशनचा ‘सुपर ३०’ या चित्रपटाचे देखील ते निर्माते आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘गेम ओवर’ चित्रपटामुळे देखील ते खूप प्रसिद्ध झाले होते.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणाले की, ‘करण जोहर स्वतः एक ब्रॅंड आहे. ते फक्त त्यांच्या चित्रपटांमुळे नाही तर सोशल मिडियावर पण खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. करणचे डुडल्स असो किंवा त्यांचा एयरपोर्ट लुक असो ते नेहमीच कोणत्याही कारणावरुन चर्चेमध्ये असतात. त्यांचे फॉलोअर्स खूप आहेत. ते एकमेव चित्रपट निर्माते आहेत ज्यांचे बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्यांसारखे फॉलोअर्स आहेत.

अश्वन कौल पुढे म्हणाले की, ‘१४ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणारे ६०० पेक्षा अधिक समाचार स्त्रोतोंपासून ही रॅकिंग उपलब्ध होते. हा नंबर फेसबुक, ट्विरट, प्रिंट प्रकाशन, वायरल न्यूज, ब्रॉडकास्ट प्लेटफॉर्म सारखे शेकडो स्त्रोतांमध्ये घेतला गेला आहे. मग या अत्याधुनिक डेटा प्रक्रियेत अनेक अत्याधुनिक एल्गोरिदम मदत करतात. ज्याद्वारे आम्ही बॉलीवूड स्टारच्या स्कोअर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.’

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

Loading...
You might also like