करिना कपूर भडकली, म्हणाली – ‘प्रत्येक वेळी मुलींनाच का विचारले जातात असे प्रश्न ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ब्युटी विथ ब्रेन अक्टर म्हणून ओळखली जाते. नुकताच तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूर समाजात घडणा-या गोष्टींवर आपला राग व्यक्त करतानाच दिसत आहे. त्याचबरोबर ती तिच्या हक्कांबद्दल बोलतानाही दिसत आहे. लग्नाआधी लग्न कधी करणार, लग्न झाल्यानंतर आई बनण्याबाबत विचारल्या जाणा-या प्रश्नानं करिना कपूर चांगलीच वैतागली होती. स्त्रीसाठी आई बनणं एवढंच असत का ? असा सवाल तिनं हा प्रश्न विचारणा-यांना केला होता.

करीना कपूरचा हा व्हिडिओ बॉलिवूड व्हायरलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये समाजावर तिथे प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे. आधी खूप आभ्यास करा, आभ्यास करता करता चष्मा लागलाच तर चश्मिश म्हणून चिडवले जाते. लिपस्टिक लावली तर हिरोईन म्हणून चिडवतात. चारित्र्यावर शंका उपस्थित करू नये म्हणून इतरांच्या भीतीपोटी लवकर घरी या. पण या सगळ्यांमध्ये माझा जगण्याचा हक्क कुठे आहे. सैफशी लग्न झाल्यानंतर लाईफ बदलली नसल्याचं बेबोने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. लग्नाधी लग्न कधी करणार, लग्न झाल्यानंतर आई बनण्याबाबत विचारल्या जाणा-या प्रश्नानं करिना कपूर चांगलीच वैतागली होती. स्त्रीसाठी आई बनणं एवढंच काही नसतं असा सवाल तिनं हा प्रश्न विचारणा-यांना केला होता.

सैफशी लग्न झाल्यानंतर लाईफ बदलली नसल्याचं बेबो सांगते.. समाज काय म्हणेल याच्याच अवतीभोवती आपण फिरतो. बदल होतोय पण फार कमी प्रमाणात सतत मुलींना नको ते प्रश्न विचारणे बंद होतील तेव्हाच समाज खरा बदल घडेल. शेवटी चेंज इज व्हेरी ब्युटीफुल.