‘बेबो’ करीना कधी देणार दुसऱ्या बाळाला जन्म ? सैफ अली खाननं केलं कंफर्म ! हेही सांगितलं, कसंय कुटुंबातील वातावरण

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिचा पती ॲक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी आता नवा पाहुणा येणार आहे. सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच तैमूर अली खानला (Taimur Ali Khan) भावंड मिळणार आहे. सध्या करीना तिचा प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत आहे. या काळात ती सोशलवर ॲक्टीव्ह दिसत आहे. करीना तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिनं प्रेग्नंसीमध्ये योगा करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर केले होते. काहींनी करीनाला यासाठी ट्रोलही केलं होतं. आता पती सैफनं हे कंफर्म केलं आहे की, करीना दुसऱ्या बाळाला जन्म कधी देणार आहे.

आधी तर असं सांगितलं जात होत की, करीना मार्चमध्ये बाळाला जन्म देणार आहे. परंतु आता सैफ अली खाननं सांगितलं आहे की, करीनाची ड्यु डेट मार्च नाही तर फेब्रुवारी आहे. सैफनं कंफर्म केलं की, करीना फेब्रुवारीतच बाळाला जन्म देणार आहे.

ADV

सैफ असंही म्हणाला की, तो त्याच्या दुसऱ्या मुलाला घेऊन खूप कॅज्युअल आहे सोबत खूप उत्सुकही आहे. एका मुलाखतीत सैफनं सांगितलं की, दुसरं बाळ होणं एक मोठी जबाबदारी आहे आणि हे खूप भीतीदायकही आहे.

सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो बंटी और बबली आणि भूत पोलीस सिनेमात काम करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर प्रभास आणि क्रिती सेननच्या आदिपुरुष या सिनेमातही तो झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तो तान्हाजी सिनेमानंतर जवानी जानेमन सिनेमात दिसला होता. नुकतीच त्याची तांडव ही वेब सीरिज देखील रिलीज झाली आहे. याशिवाय त्यानं कलाकांडी, शेफ, लाल कप्तान अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.