गरोदरपणातील अनुभवावर पुस्तक लिहिलणार करीना कपूर खान, 2021 मध्ये होणार ‘पब्लिश’

नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर खान दुसर्‍यांदा गरोदर आहे आणि ती गर्भावस्थेबाबत एक मार्गदर्शक पुस्तक लिहिण्याच्या तयारीत आहे. प्रकाशक जगरनॉटने रविवारी ही माहिती दिली. करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल (Kareena Kapoor Khan’s Pregnancy Bible) नावाचे हे पुस्तक पुढील वर्षी प्रकाशित होईल. आपला पहिला मुलगा तैमूर अली खानच्या चौथ्या वाढदिवसाला करीनाने ही घोषणा केली आहे.

अभिनेत्री करीना कपूरने इंस्टाग्रामवर पुस्तकाचे टायटल पेज (मुखपृष्ठ) शेयर करत लिहिले की, आज सर्व भावी मातांसाठी ‘करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल’ची घोषणा करण्याचा सर्वात चांगला दिवस आहे. या पुस्तकात गरोदर मातांमध्ये सकाळच्या कमजोरीपासून खाणेपिणे आणि आरोग्य, प्रत्येक गोष्टीबाबत वाचायला मिळेल. हे पुस्तक जगरनॉट प्रकाशन 2021 मध्ये पब्लिश करेल.

 

 

 

 

 

 

 

या 40 वर्षीय अभिनेत्रीने म्हटले, मला वाटते की, गरोदरपणा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्या दरम्यान आपण सक्रिय, निरोगी आणि आनंदी असले पाहिजे. या पुस्तकात मी आपल्याला सांगेन की, माझ्या गरोदरपणात मी कशी राहिले आणि तुम्हाला ती सर्व माहिती देईन जी तुम्हाला तुमच्या गरोदरपणात खुश ठेवेल. हा विषय माझ्यसाठी खुप महत्वाचा आहे आणि मी एक असे पुस्तक लिहित आहे, जे इतर महिलांना मदत आणि मागर्दशन करेल.

अभिनेत्री करीना कपूर खानने शुक्रवारी म्हटले की, माझा मुलगा तैमूरच्या नावावरून झालेल्या वादादरम्यान मी प्रमाणापेक्षा जास्त घाबरले होते. करीना आणि सैफ अली खानने 2016 मध्ये आपल्या पहिल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले. नाव सार्वजनिक होताच सोशल मीडियावर लोकांनी नाव आणि त्याच्या मुळावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात केली होती.

पत्रकार बरखा दत्तसोबत ‘वी द वूमन’च्या ऑनलाइन सेशनमध्ये करीनाने मोकळेपणाने सांगितले की, त्यावेळी तिने कशाप्रकारे घाबरलेल्या स्थितीत वेळ घालवला. अभिनेत्री म्हणाली, त्याच्या नावाबाबत जे झाले ते खुप भितीदायक होते. ते खुप घृणास्पद होते आणि ते मी कधीही विसणार नाही. एक माणूस आणि माता म्हणून मी खुप घाबरले होते. मी माझ्या मुलाचे नाव काय ठेवायचे, मी त्याला कोणत्या नावाने हाक मारेन, हा पूर्णपणे माझा निर्णय आहे आणि याच्याशी दुसर्‍यांचा काहीही संबंध नाही.

करीनाने प्रसुतीनंतर ताबडतोबच्या एका घटनेची आठवण सांगताना म्हटले की, कशाप्रकारे एक प्रसिद्ध व्यक्ती हॉस्पिटलमध्ये तिला आणि तिच्या बाळाला भेटायला आला आणि नावाबाबत प्रश्न विचारू लागला. तिने म्हटले, एक प्रसिद्ध व्यक्ती मला आणि माझ्या बाळाला भेटण्याच्या नावाने आला. चर्चेदरम्यान त्याने म्हटले, काय झालंय तुला? तु तुझ्या मुलाचं नाव तैमूर ठेवणार आहेस? मुलाला जन्म देऊन अजून आठ ताससुद्धा झाले नव्हते.

करीनाला ही गोष्टी खुप विचित्र वाटली की, लोक इतिहासात शेकडो वर्ष मागे जाऊन तिच्या पसंतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. करिना त्या व्यक्तीला म्हणाली, तुम्हाला कसे समजले की मी त्याचे नाव अशाप्रकारे ठेवले आहे? आम्ही अर्थाच्या आधारावर नाव ठेवले…ज्याचा अर्थ आहे लोह, असा व्यक्ती जो मजबूत आहे. तो जो होऊन गेला (इतिहासात) त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही.