‘बेबो’ करीनानं लाख प्रयत्न करूनही ‘लाडक्या’ तैमूरनं तिला हात पकडू दिला नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमूर अली खान खूपच क्युट स्टारकिड आहे. नेहमीच तो कुठे ना कुठे स्पॉट होत असतो. अलीकडेच तैमूर अली खान एअरपोर्टवर स्पॉट झाला. यावेळी त्याच्यासोबत त्याची आई करीनाही होती. करीनानं त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न लाख प्रयत्न केला परंतु तैमूर मात्र आपल्या मम्मीचा हात धरायला तयारच नव्हता.

तैमूर आता 3 वर्षांचा झाला आहे. तैमरला आईचा हात धरल्याशिवाय चालणं पसंत आहे असं दिसतंय. तैमूरच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यानं ब्लू जिन्स, चैक्सचा शर्ट घातला होता. त्याच्या हातात चॉकलेट्सही होते. त्याच्या पाठीवर बॅगही अडकवलेली होती. तैमूर खूपच क्युट दिसत होता. तैमूर बिंधास्तपणे चालत होता. त्याचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते.

तैमूरचे एअरपोर्टवरील काही फोटो समोर आले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान फोटो व्हायरल होण्याची ही काही त्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसले आहेत. तैमूर अली खान सर्वात चर्चित स्टारकिडपैकी एक आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणानं तो चर्चेत असतोच.