बंगलुरु : कन्नड समर्थकांनी ‘तामिळ’ साइन बोर्ड हटवले

बंगलुरु : कर्नाटकाच्या सीमा भागात मराठी आणि कन्नड समर्थकांमध्ये नेहमीच भाषेवरुन वाद होत असतात. आता कन्नड समर्थकांनी बंगळुरुमधील एआयएडीएमके नेत्या शशीकला राहत असलेल्या रिसॉर्टजवळील तामिळ साईन बोर्ड काढून टाकले आहेत. एआयएडीएमके च्या नेत्या शशिकला या येथील रिसॉर्टमध्ये रहात होत्या. त्या काल चेन्नईला रवाना झाल्या.

 

 

 

 

 

 

जयललिता यांच्या जवळच्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या शशिकला यांना भ्रष्ट्राचार प्रकरणी ४ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांना बंगळुरु येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर त्यांना २७ जानेवारी रोजी तुरुंगातून सोडण्यात आले. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्या गेले काही दिवस येथील रिसॉर्टमध्ये रहात होत्या. त्यावेळी या रिसॉर्टच्या आजू बाजूला तामिळीमध्ये साईन बोर्ड लावण्यात आले होते.

कन्नड समर्थकांनी आज सकाळीच हे साईनबोर्ड काढून टाकले. यावेळी समर्थकांनी सांगितले की, शशिकला या तुरुंगातून बाहेर आल्यावर येथे रहात होत्या. आता त्या परत गेल्याने येथे तमिळ बोर्ड लावणे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही ते काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले.