कर्नाटक लोकसेवा आयोगाचा पेपर फुटला; आज होणारी परिक्षा रद्द, पेपर फोडणार्‍या 6 जणांना अटक

बेंगळुरु : कर्नाटक लोकसेवा आयोगाचा (Karnataka Public Service Commission) आज होणारा फस्ट डिव्हिजन असिस्टंट (एफडीए) चा पेपर फुटला असून पेपर फोडणार्‍या ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे लोकसेवा आयोगाने आज होणारा हा पेपर रद्द केला आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगाचे (Karnataka Public Service Commission) सचिव जी सत्यवती यांनी रविवारी होणारी एफडीए चाचणी रद्द करण्याचे आदेश दिले आहे. एफडीएच्या परिक्षेचा पेपर फुटल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.

केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) या पेपर फुटीच्या घोटाळ्याचा पदार्फाश केला आणि केपीएससी ला याविषयी माहिती दिली. राचाप्पा आणि चंद्रू अशी ओळख पटविण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. एका गुन्हेगाराने या घोटाळ्याची माहिती केंद्रीय गुन्हे शाखेकडे दिली. त्यावर तातडीने कारवाई करत पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.

 

 

 

 

सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी Tweet केले की, केपीएससी पेपर लीक घोटाळ्यातील ६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २४ लाखांची रोकड, एफडीएच्या प्रश्नपत्रिकांसह ३ वाहने जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.