Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai ) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वाद (Maharashtra Karnataka Border Issue) शिगेला पोहचला आहे. त्यात, कन्नड रक्षण वेदिकेने या वादात तेल टाकून हा वाद अजून भडकवायचे काम केले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी बेळगाव येथील महाराष्ट्र कर्नाटक सीमा टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या बस फोडल्या होत्या. त्यानंतर, कन्नड रक्षण वेदिकेने संजय राऊत (Sanjay Raut) यांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.

बुधवारी संजय राऊतांना (Shivsena MP Sanjay Raut) दोन धमकीचे फोन (Death Threats Calls To Sanjay Raut) आले असून फोनवरून राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांना धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. कन्नड रक्षण वेदिकेने हे धमकीचे फोन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शंभूराज देसाई यांनी बुधवारी (७ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)
यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EM Eknath Shinde) यांच्याबाबत राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून शंभूराज
यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. ‘हे सरकार नामर्द आहे,’ असे संजय राऊत म्हणाले.
त्यानंतर संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.
या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

Web Title :- Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut  | Karnataka Rakshana Vedike give death threats to sanjay raut threatening phone call

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pulses For Cholesterol | हार्ट अटॅक-स्ट्रोकला कारणीभूत ठरणार्‍या ’बॅड कोलेस्ट्रॉल’ शरीरातून बाहेर काढतील ‘या’ 5 प्रकारच्या डाळी; जाणून घ्या

Ayurveda And Smoking | धुम्रपानाचे व्यसन सुटत नाही का? मग जाणून घ्या आयुर्वेद तज्ज्ञांकडून यावर उपाय

Pinched Nerve Remedies | शरीरातील नस दबल्याने गंभीर वेदना होत आहेत का? मिनिटात आराम देतील ‘हे’ 5 उपाय, आखडण्याची समस्या होईल दूर