Kartik Aaryan | कार्तिक आर्यनच्या आगामी ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात बॉलीवुडच्या ‘या’ बड्या अभिनेत्रीची एन्ट्री

पोलीसनामा ऑनलाइन- अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) बी-टाऊन मधील चर्चेत असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. कार्तिक आर्यन व अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kartik Aaryan And Kiara) सध्या ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रदर्शन करत आहे. अशा मध्ये आता कार्तिकच्या चाहत्यांना त्याच्या पुढील चित्रपटाबाबतही उत्सुकता लागली आहे. कार्तिकचा (Kartik Aaryan) पुढील चित्रपट हा क्रिकेटवर आधारित ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) हा असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटाबबात मोठी अपडेट समोर आली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन हा एक प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेता आहे. त्याची व कियाराची जोडी प्रेक्षकांना आवडली असून त्यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट गाजत आहे. या आधी त्यांचा ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiya 2) हा चित्रपटही गाजला होता. मात्र आता अभिनेता कार्तिक आर्यनच्या पुढच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) स्क्रीन शेअर करणार आहे. ‘चंदू चॅम्पियन’मध्ये कार्तिकसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारताना झळकणार आहे. ‘चंदू चॅम्पियन चित्रपटाची कथा क्रिकेटवर आधारित असणार असून यामध्ये प्रेक्षकांना उत्तम स्पोर्ट्स ड्रामा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येणार असून उत्कृष्ट वीएफएक्स पाहायला मिळणार आहेत. या बहुचर्चित चित्रपटाची दिग्दर्शन धुरा कबीर खान (Kabir Khan) यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांनी केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी श्रद्धाला या चित्रपटाबाबत विचारले होते आता ती मुख्य भूमिका साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

अभिनेता कार्तिकचा (Kartik Aaryan) एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना दुसरा चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ प्रेक्षकांमध्ये चर्चिली जात आहे. याचबरोबर तो आगामी ‘कॅप्टन इंडिया’ (Captain India) व ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) या सिनेमांमध्येही झळकणार आहे. ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा कार्तिक आर्यन व श्रद्धा कपूरची (Kartik Aryan And Shraddha Kapoor) ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट 2024 साली 14 जून रोजी रिलिज होणार आहे.

Web Title :  Kartik Aaryan | gossip kartik aaryan film chandu champion entry bollywood actress chandu champion know details

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून सराफी दुकान लुटण्याच्या तयारीतील तिघांना अटक, हत्यारे जप्त

NCP Chief Sharad Pawar | पक्ष फोडणाऱ्यांना किंमत मोजावी लागणार ! खा. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे निलंबित करत शरद पवारांचा इशारा

Bank fraud case: CBI registers FIR against Pune-based builder