NCP Chief Sharad Pawar | पक्ष फोडणाऱ्यांना किंमत मोजावी लागणार ! खा. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे निलंबित करत शरद पवारांचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NCP Chief Sharad Pawar | पक्ष फोडणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) दिला आहे. आम्ही जनतेमध्ये जणार असून जनतेवर पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले. खासदार प्रफुल्ल पटेल (MP Praful Patel) आणि सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांचे राष्ट्रवादीतून निलंबन (Suspension) करण्यात आलं असून तशी घोषणा दिल्लीतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर केली. तसेच ज्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय बैठकीत आज आठ प्रस्ताव पारित करण्यात आले आहेत.

 

जर राष्ट्रवादीच्या विचारधारेच्या विरोधात कुणी जात असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा शरद पवारांवर पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नसून मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमचा निवडणूक आयोगावर (Election Commission) विश्वास असून आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडू असं देखील शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर (Maharashtra NCP Political Crisis)
आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत पहिल्यांदाच बैठक पार पडली.
त्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या आधी बुधवारी अजित पवार (Ajit Pawar)
हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतील असा ठराव अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांनी केल्याची माहिती आहे.

 

Web Title : NCP Chief Sharad Pawar | sharad-pawar-vs-ajit-pawar-ncp-suspended-praful-patel-sunil-tatkare-nine-ministers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा