Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून सराफी दुकान लुटण्याच्या तयारीतील तिघांना अटक, हत्यारे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | हडपसर परिसरातील माळवाडी रोडवरील तुपे सभागृहाजवळील एका सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत (Robbery In Pune) असलेल्यांपैकी तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट- 5 च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 कोयते आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Pune Police Crime Branch News)

 

गणेश बबन लोंढे Ganesh Baban Londhe (23, रा. तरवडे वस्ती, महमंदवाडी, पुणे), निरंजन दिपक ननवरे Niranjan Deepak Nanware (19, रा. वंडीशेगाव, शेळके चौकी, पंढरपुर, जि. सोलापूर) आणि माऊली बंडु लोंढे Mauli Bandu Londhe (21, रा. पांढरे मळा, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी युनिट-5 कडील अधिकारी व पोलिस अंमलदार हे हडपसर पोलिस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत कोम्बींग ऑपरेशन करीत असताना काहीजण सराफी दुकान लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. (robbery in pune)

 

प्राप्त माहितीची पोलिसांनी खातरजमा केली. पोलिसांनी छापा टाकला असता काही जणांना पोलिसांची चाहुल लागल्याने त्यांनी पलायन केले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 2 कोयते, एक स्क्रु-ड्रायव्हर, लाल मिरची पाडवर, नायलॉनची दोरी अशी घातक हत्यारे आढळून आली. आरोपींविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरूध्द वेगवेगळया पोलिस ठाण्यात 15 गुन्हे दाखल आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उल्हास कदम (Sr PI Ulhas Kadam), पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे (PSI Avinash Lohote), पोलिस अंमलदार शहाजी काळे, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे आणि अमित कांबळे याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title : Pune Police Crime Branch News | The crime branch arrested three people who were preparing to
rob a Sarafi shop, seized weapons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा