Kartik Aaryan | अंगात 101 डिग्री ताप असताना केले पाण्याखाली शुटिंग; कार्तिकचे कामावरचे प्रेम आले दिसून

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील सुप्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा एकामागून एक हीट चित्रपट देत आहे. कार्तिकच्या अभिनयनाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. कार्तिक देखील आपल्या कामाबाबत खूप प्रामाणिक असून खूप मेहनत घेताना देखील दिसतो. अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) या चित्रपटामध्ये झळकणार आहे. हा एक जीवनपट असून कार्तिक (Kartik Aaryan) त्यासाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहे. त्याने चित्रपटासाठी शरीरावर देखील मेहनती घेतली असून 101 डिग्री ताप असताना पाण्यामध्ये उतरुन सीन दिले आहेत.

अभिनेता कार्तिक आर्यन एनेक नवनवीन प्रकारच्या भूमिका साकारताना चित्रपटामध्ये दिसत आहे. लवकरच तो स्पोर्टमन म्हणून ‘चंदू चॅम्पियन’ मध्ये झळकणार (Kartik Aaryan Upcoming Movie) आहे. यासाठी तो खूप मेहनत घेताना दिसत आहे. या चित्रपटाचे शुटिंग लंडनमध्ये चालू असून त्याने आजारी असताना देखील त्याने कामाला महत्त्व दिले आहे. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचे पूर्ण शड्युल तयार झाले असून ते पोस्टपोन करणे शक्य नसल्य़ाची बाब कार्तिकच्या लक्षात आली व तब्बेत ठीक नसताना त्याने कामास करण्यास सुरुवात केली. सेटवरील एका मेंबरने ही माहिती दिली आहे.

त्य़ांनी सांगितले की, लंडनमध्ये चित्रपटाचे शड्युल ठरवण्यात आले होते. हे शड्युल खूप टाईट होते. ते पोस्टपोन करुन रिशड्युल करणे शक्य नव्हते. ही गोष्ट कार्तिक आर्यनच्या लक्षात आली व त्याने वेळेवर शुटिंग सुरु केले. कार्तिकला तेव्हा 101 डिग्री ताप होता. त्याचे अंग तापाने गरम झाले होते तरी त्याने पाण्यामध्ये उतरुन अवघड सीन देखील दिले. अंगात एवढा ताप असताना अभिनेता कार्तिक आर्यनने पाण्याखालील अनेक सीनचे शुटिंग पूर्ण केले. त्यांनी पुढे सांगितले की, कार्तिकच्या या चित्रपटाच्या प्रामाणिकपणा बद्दल दिग्दर्शक कबीर खान (Director Kabir Khan) हे कार्तिकवर खूप इम्प्रेस झाले आहेत.

अभिनेत कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा नेहमीच त्याच्या चित्रपटांने व अभिनयाने चाहत्यांना खूश करत असतो.
नुकताच त्याचा ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कार्तिक व अभिनेत्री कियारा अडवाणी (Karthik and Kiara) यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडली असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमावला. त्य़ाचा आता ‘चंदू चॅपियन’ हा जीवनपट येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून निर्मिती साजिद नाडियाडवाला (Producer Sajid Nadiadwala) यांनी केली आहे. ‘चंदू चॅपियन’ हा चित्रपट भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर (Muralikant Petkar) यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे रिपोर्टमधून सांगितले जात आहे. तसेच हा चित्रपट 14 जून 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title :  Kartik Aaryan | kartik aaryan shoot underwater scene in high fever for chandu champion in london

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा