काय सांगता ! होय, करोडपती असलेला ‘हा’ अभिनेता आजही प्रवास करतो रिक्षातून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता कार्तिक आर्यनचा काही दिवसांपूर्वीच पती पत्नी और वो हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर कार्तिकचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीत पोहचले. परंतु खऱ्या आयुष्यात तो अत्यंत साधे जीवन जगतो असे त्यांच्या नुकत्याच समोर आलेल्या काही फोटोवरुन दिसते. काल रात्री स्टार असलेला कार्तिक सर्वसामान्य माणसासारखा दिनेश विजनच्या ऑफिसमध्ये कारने नाही तर रिक्षाने गेला. 
कार्तिक लव आजकल 2 मध्ये दिसणार आहे. सध्या तो सारा अली खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. या सिनेमाची शुटींग पूर्ण झालं आहे. हा सिनेमा सैफ अली खान आणि दिपिका पाादुकोन यांच्या लव आज कलचा सिक्वेल असणार आहे. तसेच भुल भुलैय्या 2 या सिनेमात देखील कार्तिक चाहत्यांना दिसणार आहे. 
या सिनेमात त्याच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत असेल. तसेच असे ही वृत्त आहे की या सिनेमात अभिनेत्री तब्बू देखील दिसणार आहे. 
कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होता आहे. ज्यात कार्तिकने साराला एका सॅन्डलवर वॉक करण्याचे चॅलेंज दिले. साराने एका सॅन्डलवर चालण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा पाय ड्रेसमध्ये अडकून ती पाय घसरुण पडली. परंतु कार्तिकने तिचा हात पकडून तिला सावरलं. 
 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/