पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकचे भारतीय सेनेसंबंधी ‘वादग्रस्त’ ट्विट, सुरू झाले ‘वॉर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वादग्रस्त पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. तिने नुकतेच एक भारतीय सेनेविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट शेअर केले. तिने ‘काश्मीर आणि काश्मिरींच्या विरुद्ध भारतीय सेनेकडून केल्या जाणाऱ्या अत्याचारासाठी…’ असे लिहून एक वादग्रस्त फोटो शेअर केला आहे. तिच्या ता वादग्रस्त ट्विटरवर भारतीयांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तिच्या या ट्वीटमुळे लोकांचा पारा चढला आहे.

काही लोकांनी वीणाला तिने भारतात घालवलेला वेळ आणि केलेलं काम लक्षात आणून दिलं. तर काहींनी तिला तिचं स्वयंवराची आठवण करून दिलं. या शोमुळे तिला लोकप्रियता तर मिळालीच होती याशिवाय भरमसाठ पैसेही मिळाले होते. काही नेटकऱ्यांनी तिला भारतात येण्याचा सल्ला दिला. पहिल्यांदा वीणा लाइमलाइटमध्ये तेव्हा आली जेव्हा तिने भारत- पाकिस्तान सामन्यात झालेल्या मॅच फिक्सिंगबद्दल खुलासे केले. यानंतर ती बिग बॉसमध्ये दिसली. या शोमुळे तिला भारतात तुफान प्रसिद्धी मिळाली.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like