Katraj Doodh Sangh Election | कात्रज दूध संघावर 16 पैकी 15 जागा जिंकत पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सरशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (Pune District Cooperative Milk Producers Association) तथा कात्रज दूध डेअरीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये (Katraj Doodh Sangh Election) राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कात्रज दूध संघाच्या निवडणुकीत (Katraj Doodh Sangh Election) 16 पैकी 15 जागा जिंकल्या आहेत. निकाल घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

 

जिल्हा दूध संघासाठी (Katraj Doodh Sangh Election) रविवारी (दि.20) मतदान (Voting) झाले आणि सोमवारी (दि.21) सकाळी कात्रज मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले (Milind Soble) आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे (Balasaheb Taware) यांनी मतमोजणीला (Counting) सुरुवात केली. जिल्हा दूध संघातील 16 पैकी 5 संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

 

भगवान पासलकर (वेल्हे) Bhagwan Pasalkar (Velhe), गोपाळराव म्हस्के (हवेली) Gopalrao Mhaske (Haveli), राहुल दिवेकर (दौंड) Rahul Divekar (Daund) आणि अनुसूचित जाती-जमाती गटातून चंद्रकांत भिंगारे (Chandrakant Bhingare) हे चार राष्ट्रवादीचे संचालक आहेत. पुरंदरमधून बिनविरोध निवडून आलेले मारुती जगताप (Maruti Jagtap) हे काँग्रेस (Congress) पक्षाचे आहेत. त्यांना देखील सहकार पॅनेलने पुरस्कृत केले होते. तर 11 जागांसाठी 25 उमेदवार रिंगणात होते. भोरमधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार दिलीप थोपटे (Dilip Thopte) वगळता राष्ट्रवादीने सर्व जागा जिंकल्या आहेत.

 

उमेदवारांना मिळालेली मते

– आंबेगाव Ambegaon (एकूण मतदान 48)

राष्ट्रवादीचे विष्णू हिंगे (Vishnu Hinge) – 35 (विजयी)

शिवसेनेचे (Shivsena) अरुण गिरे  -12

1 अवैध

– भोर Bhor (एकूण मतदान 70)

अपक्ष दिलीप थोपटे – 38 (विजयी)

दिपक भेलके -19

काँग्रेसचे अशोक थोपटे – 12

अवैध – 1

 

– खेड Khed (एकूण मतदान 106)

राष्ट्रवादीचे अरुण चांभारे (Arun Chambhare) – 55 (विजयी)

अपक्ष चंद्रशेखर शेटे – 51

 

– जुन्नर Junnar (एकूण मतदान 109)

राष्ट्रवादीचे बाळासाहेब खिलारी (Balasaheb Khilari) -61 (विजयी)

अपक्ष देवेंद्र खिलारी – 47

अवैध 1

 

– मावळ Maval (एकूण मतदान 21)

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भाजपचे (BJP) उमेदवार बाळासाहेब नेवाळे (Balasaheb Newale) -19 (विजयी)

लक्ष्मण ठाकर -2

सुनंदा कचरे – 000

 

– मुळशी Mulshi (एकूण मतदान 15)

राष्ट्रवादीचे कालिदास गोपाळघरे (Kalidas Gopalghare) – 9 (विजयी)

रामचंद्र ठोंबरे- 000

 

– शिरूर Shirur (एकूण मतदान 168)

राष्ट्रवादीचे स्वप्निल ढमढेरे (Swapnil Dhamdhere) -130 (विजयी)

योगेश देशमुख -36

अवैध -2

 

– महिला प्रतिनिधी (2 जागा) 

केशरबाई पवार (Kesharbai Pawar) – शिरूर 548 (विजयी)

लता गोपाळे (Lata Gopale) – खेड 437 (विजयी)

रोहिणी थोरात – दौंड 85

संध्या फापाळे – जुन्नर 204

 

– इतर मागास प्रवर्ग (1 जागा) 

राष्ट्रवादीचे भाऊ देवाडे (Bhau Devade) – जुन्नर 448 (विजयी)

वरूण भुजबळ – जुन्नर 193

अरुण गिरे – आंबेगाव 36

 

– भटक्या जाती विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ (जागा 1)

राष्ट्रवादीचे निखिल तांबे (Nikhil Tambe) – रांजणगांव सांडस (Ranjangaon Sandus) – शिरुर 450 (विजयी)

प्रदीप पिंगट – बेल्हे- जुन्नर 234

अवैध -18

 

Web Title :- Katraj Doodh Sangh Election | once again NCP concurred katraj doodh sangh election 15 wons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Swati Singh | UP मध्ये भाजपच्या बड्या नेत्याच्या संसारात वादळ ! राजकारणामुळे संसार मोडला, माजी महिला मंत्र्याचा विद्यामान आमदार पतीविरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा ! केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जिनवानी इलेव्हन संघांची विजयी सलामी !!

 

Fact Check – Aishwarya Rai Bachchan Kiss Photo | अभिषेकसमोरचं ऐश्वर्यानं केलं अजय देवगनला KISS, पाहा व्हायरल फोटो..