रणबीर कपूरमुळे आलिया-कतरिनाची मैत्री तुटली?

मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेत्री आलिया भट आणि कतरिना कैफ यांच्या मैत्रीची बॉलिवूड आणि मीडियामध्ये फार चर्चा होती. पण आता त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आल्याचे समजते. हे वितुष्ट अभिनेता रणबीर कपूरमुळे आल्याची देखील चर्चा आहे.

एका संकेतथळाने याबाबत वृत्त दिले. रणबीर कपूर आणि आलिया भट सध्या अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात व्यग्र आहेत. बुल्गारियामध्ये चित्रीकरण करुन आलिया भारतात परतली. पण रणबीर सध्या लंडनमध्ये आहे. रणबीरसोबत वेगळे झाल्याचे दु:ख कतरिनाच्या मनात अजूनही कायम आहे. त्यात ‘ब्रह्मास्त्र’दरम्यान रणबीर आणि आलियाची जवळीक कतरिनाला छळत आहे.

‘ब्रह्मास्त्र’च्या चित्रीकरणा दरम्यान कास्ट आणि क्रूशी संबंधित प्रत्येक व्यक्ती रणबीर आणि आलियाच्या अफेअरबाबत बोलत आहे, असं कतरिनाच्या एका मैत्रिणीने सांगितले. तर एका कॉमन फ्रेण्डकडूनही कतरिनाला अफेअरबद्दल कळले. यामुळे कतरिना नाराज आहे.