कॅटरिना कैफला हव्या आहेत ‘या’ तीन गोष्टी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माणसाला एकाकी जीवन नकोसे वाटते. तशीच अवस्था सिनेअभिनेत्री  कॅटरिना कैफची झाली आहे. तीन वर्षांपूर्वी कॅटरिनाचे रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाले आहे. आता कॅटरिना कामात व्यस्थ आहे मात्र तिला एकटे राहायचे नाही असे तिनेच सर्वाना दर्शवून दिले आहे.

सध्या मी सिंगल आहे. मला इथून पुढे सिंगल टॅग लावून घ्यायचा नाही. मला माझ्यापुढे लागणार सिंगलचा टॅग हटवून टाकायचा आहे असे कॅटरिना नजीकच्या काळात एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे. २०१९ मध्ये कोणती तीन कामे करायची आहेत असा प्रश्न मुलाखतकारांनी विचारले असता तिने सिंगल राहायचे नाही असे उत्तर दिले आहे. एक फिल्मफेअर अवार्ड, एक बॉयफ्रेन्ड आणि स्वत:ची एक प्रॉडक्शन कंपनी अशी तीन कामे मला यावर्षी करायची आहेत असे कॅटरिना कैफ म्हणाली आहे.

रणवीर कपूर सोबत झालेल्या ब्रेकअपवर कॅटरिना या मुलाखतीत मोकळ्या मानाने बोलली आहे. रणवीर कपूर सोबत ब्रेकअप झाल्यावर माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे असे कॅटरिना कैफ म्हणाली आहे.