कतरिना कैफला करायचे ‘या’ अभिनेत्रीसोबत अफेअर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याची टॉपची अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या भारत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिला विचारलेल्या एका प्रश्नावर कैफने खळबळजन उत्तर दिले. तिच्या या उत्तराने कैफ चांगलीच चर्चेत आली आहे. तिने एका अभिनेत्रीचे नाव घेत तिच्याशी अफेअर करायला आवडेल असा खळबळजन खुलासा केला आहे.

कतरिना कैफला भारतच्या प्रमोशन दरम्याने एक प्रश्न विचारण्यात आला. तुला अफेअर करायचे असेल तर कोणाशी करशील. यावर उत्तर देताना कैफने अभिनेत्री करिना कपूरचे नाव घेतले. करिना कपूर सुंदर आणि उत्साही आहे. मला तिच्यासोबत काम करायला आवडलेच तसेच तिच्यासोबत अफेअर करायला देखील आवडेल असा खळबळजनक खुलासा कतरिनाने केला.

कतरिनाला करिनासोबत चित्रपट करण्याची इच्छा असून ही इच्छा लवकरच पूर्ण होईल असे तिला वाटते. अभिनेता रणबीर कपूरसोबत ब्रेकअपवरही तिने मन मोकळं केलं. रणबीर हा विश्वासार्ह माणूस नसल्याचं कतरिनाने म्हटलं आहे.