ब्रेकअप, घटस्फोटाच्या बातम्यांनंतर ‘केटी पेरी’नं दिली ‘Good News’, दाखवलं ‘बेबी’ बंप (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकन सिंगर केटी पेरी हिनं चाहतांना एक सरप्राईज दिलं आहे. तिनं एक म्युझिक व्हिडीओ लाँच केला आहे. Never Worn White असं या व्हिडीओचं नाव आहे. या व्हिडीओतून तिनं आपली फर्स्ट प्रेग्नंसी अनाऊंस केली आहे.

सिंगर आणि तिचा मंगेतर ओरनाल्डो ब्लूमच्या बाळाची ती आई होणार आहे. केटीचा हे पहिलच बाळ आहे. आपल्या पहिल्या प्रेग्नंसीला घेऊन केटी खूपच एक्सायटेड आहे.

केटीचं जरी हे पहिलं मूल असलं तरी तिचा मंगेतर ओरनाल्डोचं हे दुसरं आहे. तो आधीच एका 9 वर्षांच्या मुलाचा बाप आहे. त्याची एक्स वाईफ मिरांडा केर(Miranada Kerr)पासून त्याला हा मुलगा आहे.

व्हिडीओच्या शेवटी केटी बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. व्हिडीओत केटी खूपच सुंदर दिसत आहे. तिनं केलेल्या आउटफिटमुळे तर ती आणखीच गॉर्जियस दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये केटी म्हणते, “हा समर खूप बिजी होणार आहे.”

2019 मध्ये केटी भारतात आली होती. तेव्हा ती खूप चर्चेत आली होती. केटीनं रसल ब्रांडसोबत लग्न केलं होतं. परंतु हे लग्न जास्त काळ टिकलं नाही. तिनं दीड वर्षानंतर लगेच घटस्फोट घेतला.

View this post on Instagram

im a blueberry muffin tho

A post shared by KATY PERRY (@katyperry) on

View this post on Instagram

35 and never more alive 🎂✨

A post shared by KATY PERRY (@katyperry) on