‘केदारनाथ’ ची ५० कोटीच्या क्लब मध्ये एंट्री 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – रिलीजच्या दोन दिवस आधी  ‘केदारनाथ’ या चित्रपटविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती परंतु याचित्रपटाने अनेक अडचणी पार करत ५० कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. केदारनाथ चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्यावर बंदी घालण्याची अनेकजण मागणी करत होते  रिलीजपूर्वी या  चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर उत्तराखंडातील  केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी या चित्रपटाचा तीव्र विरोध केला होता तसेच  हा चित्रपट हिंदूंच्या भावना दुखावणाराआहेअसा दावा या पुजा-यांनी केला होता.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी  ७. २५ कोटी शनिवारी ९. ७५ ,रविवारी १०. ७५, सोमवारी ४. ४५ ,मंगळवारी ३. ७५, बुधवारी ३. २५, गुरुवारी ३ कोटी; शुक्रवारी ३. १०  पहिल्या आठवड्यात असे टप्पे पार  ५० कोटी कमावले आहे या चित्रपटाचे बजेट ३५ कोटी इतके होते.

लव्ह स्टोरीवर आधारित या चित्रपटात साराअली खान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या केमिस्ट्रीला लोकांनी चाललेच पसंत केले आहे  चित्रपटात सुशांत एक गाईडच्या भूमिकेत आहे जो की मुस्लिम असतो  तर सारा हीने एका हिंदू मुलीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अनेक चढ -उतार दाखवण्यात आले आहे.

५० कोटीच्या क्लब मध्ये  एंट्री केल्या नंतर २१ डिसेंबर ला रिलीज होणाऱ्या शाहरुख च्या झीरो पुढे टिकणं केदारनाथ ला थोडेसे कठीण जाणार आहे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिने याचित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आहे. तिचा दुसरा चित्रपट सिम्बा २८ डिसेंबर ला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.