पूरग्रस्त केरळसाठी रिलायन्सने केली भरभक्कम रकमेची मदत

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

केरळ मध्ये पावसाने अक्षरश: हाह:कार माजवला. केरळमधील पूर हा गेल्या शतकातील सर्वात भीषण महापूर मानला जात आहे. पूर्ण देशातून केरळ साठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशातच देशातील बलाढ्य उद्योगपती असलेल्या अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स फाऊंडेशनने पूरग्रस्तांना मोठी मदत केली आहे. रिलायन्सने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. इतकंच नाही तर रिलायन्स फाऊंडेशन तब्बल ५१ कोटी रुपयांचं आवश्यक साहित्य पाठवणार आहे.

रिलायन्सने देऊ केलेली ही मदत, अनेक राज्यांनी दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचे तर फडणवीस सरकारने केरळसाठी २० कोटी रुपये दिले आहेत. महाराष्ट्राची ही मदत अन्य राज्यांपेक्षा जास्त आहे. आता रिलायन्सने त्यापेक्षा जास्त दिली आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या अधिकृत ट्विटरवर ट्विट करून देखील ही माहिती देण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B01MZ6ER2J,B01M64VYM6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4c6be3f4-a6c4-11e8-a9db-bda989be97e8′]

रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यांनी केरळमधील जनतेप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. “केरळचे नागरिक कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यामुळे रिलायन्स फाऊंडेशन आवश्यक ती सर्व मदत करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 कोटी रुपयांची मदत देत आहोत” असं नीता अंबानी यांनी सांगितलं.

इतकंच नाही तर रिलायन्स फाऊंडेशनने केरळमध्ये नुकसान झालेल्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, पुनर्वसन केंद्र, शाळा, रुग्णालयांची डागडुजी करण्याची घोषणाही केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने केरळसाठी ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. शिवाय केरळला या मोठ्या संकटातून उभा करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आ