Keshav Nagar Mundhwa Crime | पुणे : प्रेम संबंधामध्ये दुरावा, तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Keshav Nagar Mundhwa Crime | प्रियसीने ब्रेकअप (Breakup In Love) केल्याने संतापलेल्या प्रियकराने तरुणीला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना केशवनगर येथील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये शनिवारी (दि.13) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 24 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.14) मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन तोसीफ हारुण पठाण Tosif Harun Pathan (वय-30 रा. पाषाणकर गॅस एजन्सीजवळ, लोणी काळभोर, पुणे) याच्यावर आयपीसी 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी ऐकमेकांचे मित्र आहेत. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर काही दिवस ते रेलेशनमध्ये होते. मात्र, काही दिवसांनी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. तो सतत तिचा पाठलाग करून बोलण्यासाठी दबाव टाकत होता. पीडित तरुणी शनिवारी केशवनगर येथील एका हॉटेलमध्ये गेली होती.

पीडित तरुणी हॉटेलच्या पार्किंमध्ये पार्क केलेली गाडी घेण्यासाठी गेली असता तोसीफ पठाण त्याठिकाणी आला.
त्यावेळी तरुणीने त्याला ‘मला तुझ्या सोबत रिलेशनमध्ये रहायचे नाही, तु मला यापुढे त्रास देयचा नाही’ असे सांगितले.
याचा राग आल्याने तोसीफ याने तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
तसेच हाताने मारहाण केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cheating Fraud Case Pune | पुणे : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत साडे 17 लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल

Aba Bagul Meets Devendra Fadnavis | पुण्यात काँग्रेसला नाराजीचा मोठा फटका, आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, धंगेकरांच्या अडचणी वाढणार?

Jayant Patil | फडणवीसांनी भेटीला बोलावलेल्या नेत्याचा जयंत पाटलांना फोन, म्हणाले – ‘विजयदादांना पक्षात घेतलं चांगले केलं, राजकीय वर्तुळात चर्चा’