Cheating Fraud Case Pune | पुणे : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत साडे 17 लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cheating Fraud Case Pune | शेअर बाजारात गुंतवणूक (Investment In Share Market) केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून (Lure Of Good Returns On Investment) पुण्यातील एका व्यक्तीची 17 लाख 42 हजार 900 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) सोलापूर (Solapur) येथील एका व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2021 जे जानेवारी 2022 या कालावधीत खराडी येथे घडला आहे.

याबाबत योगेश कुंडलिक गायकवाड (वय-39 रा. भावडी रोड, वाघोली) यांनी रविवारी (दि.14) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी हेमंत रमेश संघा Hemant Ramesh Sangha (रा.भारत नगर, विडी घरकुल, सोलापूर) याच्यावर आयपीसी 419, 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत संघा याने फिर्य़ादी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळतो असे सांगून विश्वास संपादन केला. तसेच हेमंत याने फिर्यादी यांना शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून गुंतवलेल्या पैशांवर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. हेमंत याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्याच्या कालावधीत 19 लाख 16 हजार 900 रुपयांची गुंतवणूक केली.

मात्र, त्यानंतर फिर्यादी यांना कुठलाही परतावा न मिळाला नाही.
आपली फसवणूक होत असल्याचा संशय आल्याने योगेश यांनी हेमंत याच्याकडे पैशांची मागणी केली.
त्यावेळी त्याने एक लाख 74 हजार रुपये फिर्यादी यांना दिले. मात्र, उर्वरीत पैसे देण्यास टाळाटाळ करुन हेमंत याने
फिर्यादी यांच्या पैशांचा अपहार करुन फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगेश गायकवाड यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांचा गंभीर आरोप, ”अजितदादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करून धमकी…”

Murlidhar Mohol | ‘हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप’ – मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe | अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा घडवले राजकीय सभ्यतेचे दर्शन, यासाठी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून घेतला माईक