Jayant Patil | फडणवीसांनी भेटीला बोलावलेल्या नेत्याचा जयंत पाटलांना फोन, म्हणाले – ‘विजयदादांना पक्षात घेतलं चांगले केलं, राजकीय वर्तुळात चर्चा’

अकलुज : Jayant Patil | रणजितसिंह मोहिते-पाटीलही (Ranjitsinh Mohite-Patil) आज वेगळ्या पक्षात नाहीत. उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी मला फोन करुन सांगितले की, तुम्ही विजयदादांना (Vijaysinh Mohite–Patil) पक्षात घेऊन चांगले करत आहात. उत्तम जानकर आणि माझेही ठरले आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. त्यांच्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण उत्तम जानकरांना पक्षात घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या हालचाली सुरू असताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. ते अकलुजमध्ये (Akluj) बोलत होते.

सध्या सोलापुरच्या (Solapur) माढ्यात (Madha Lok Sabha) मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी रविवारी शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

या पक्षप्रवेश सोहळ्यात जयंत पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाया पडले. यावरून देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपाने मोहिते पाटील घराण्याच्या नाराजीला महत्त्व दिले नाही. मात्र, शरद पवारांच्या गटात मोहिते-पाटील घराण्याला आदराचे स्थान असल्याचा संदेश यातून दिला गेला.

यावेळी आपल्या भाषणात जयंत पाटील म्हणाले, विजयदादा आणि शरद पवार कधीच वेगळे नव्हते. विजयदादांनी कधीच पक्ष सोडला नव्हता. विजयदादा हे जुने सोने आहे, पण भाजपला या सोन्याची किंमत ओळखता आली नाही. त्यासाठी शरद पवार यांच्यासारखा जातिवंत सोनारच लागतो.

जयंत पाटील म्हणाले, शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात जिव्हाळा आहे, म्हणूनच मध्यंतरी शरद पवार
त्यांना भेटून गेले होते. त्यांचा ५० वर्षांचा ऋणानुबंध आहे. आज अकलूजपासून महाराष्ट्रात मोठा बदल होणार आहे.

जयंत पाटील पुढे म्हणाले, माढ्याचे विद्यमान खासदार कधी संसदेत बोलल्याचे मी ऐकले नाही. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हेच संसदेत बोलत असतात. शरद पवार यांचे जहाज आजवर कधीच बुडाले नाही. महाराष्ट्राने प्रत्येक संकटात हे जहाज तारले.

उत्तम जानकरांसाठी फडणवीसांची फिल्डिंग…

माढा आणि सोलापूरमध्ये (Solapur Lok Sabha) प्रभाव असलेले धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हे भाजपसोबत
जाणार की मोहिते-पाटलांसोबत राहणार, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्याने आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही
माढ्यासाठी हालचाली करण्यास सुरूवात केली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी उत्तम जानकर यांना सोमवारी बारामतीला (Baramati) विशेष विमान पाठवून मुंबईत सागर बंगल्यावर बोलावून घेतल्याचे वृत्त होते.
येथे उत्तम जानकरांसोबत चर्चा झाल्यानंतर फडणवीस त्यांना घेऊन थेट दिल्लीला अमित शहांच्या (Amit Shah)
भेटीला जाणार असल्याची चर्चा होती.
मात्र, जयंत पाटील यांनी जानकरांविषयी अकलूजमध्ये बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे आता वेगळीच राजकीय चर्चा रंगली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांचा गंभीर आरोप, ”अजितदादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करून धमकी…”

Murlidhar Mohol | ‘हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप’ – मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe | अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा घडवले राजकीय सभ्यतेचे दर्शन, यासाठी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून घेतला माईक