KGF 2 चा सुपरस्टार ‘यश’ रवीना टंडनला म्हणाला, ‘चीज बडी है मस्त मस्त’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कन्नड सुपरस्टार यश लवकरच आगामी सिनेमा केजीएफ चॅप्टर 2 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिनंही भूमिका साकारली आहे. या सिनेमात रवीनानं महिला पोलिसाची भूमिका साकारली आहे. रमिका सेन असं तिच्या पात्राचं नाव आहे. यश रवीना टंडनसोबत काम केल्याबद्दल खूप उत्साहित आहे.

यशनं सिनेमात रवीनाचं स्वागत केलं आहे. इंस्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत यश म्हणतो, “रमिका सेन भलेही रॉकीच्या भागात प्रवेश करू शकत नसेल परंतु रवीना मॅमचं यशच्या होमटाऊनमध्ये स्वागत आहे. तुम्ही सिनेमात आहात याचा मला आनंद वाटत आहे. चला ब्लास्ट करूयात.” रवीनानंही यशसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. इंस्टाग्रामवरून शेअर केलेल्या या व्हिडीओ दोघांचं बूमरँग दिसत आहे. दोघंही लुक देताना दिसत आहेत.

रवीनानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “जेव्हा लुकही जीव घेऊ शकतो. रॉकीविरोधात डेथ वॉरंट साईन करण्यात आलं आहे.” यावर यशनं मोहरा सिनेमातील लोकप्रिय गाण्याचे बोल वापरत कमेंट केली आहे. यश म्हणाला, “ये वॉरंट चीज है बडी मस्त मस्त. तरीही रॉकिच्या परवानगीची गरज आहे. सध्या आपण लुकवर लक्ष केद्रीत करूयात.
image (6)

You might also like