Khalapur Irshalwadi Landslide | ‘…मग हे कसलं प्रशासन?’ इर्शाळवाडी दुर्घटनेवर राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रायगड जिल्ह्यातील (Raigad District) खालापूरनजीक इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्याची (Khalapur Irshalwadi Landslide) दुर्दैवी घटना घटली आहे. या घटनेत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेत अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाडले गेली. बुधवारी (दि.19) रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, एनडीआरएफच्या टीमकडून (NDRF Team) शोध मोहीम (Search Operation) हाती घेण्यात आली. अतिवृष्टीमुळे इर्शाळवाडीत दुर्घटना (Khalapur Irshalwadi Landslide) घडल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेवर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनाला धारेवर धरलं आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच जखमींवर उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काही मदत करता येईल हे पाहण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना केले आहे. राज ठाकरे म्हणाले, रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा, अस राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

इर्शाळवाडीत काय घडलं?

रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या (Morbay Dam) वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा
दरड कोसळल्याची (Khalapur Irshalwadi Landslide) घटना घडली. दरडीखाली 30 ते 40 घरं दबल्याचा अंदाज
व्यक्त केला जात आहे. हा आदिवासी पाडा असून साधारण 250 लोक याठिकाणी राहतात.
आतापर्यंत 103 जणांना रेस्क्यू केले आहे. तर 12 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अद्यापही मदतकार्य सुरु आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे इर्शाळवाडीत पोहोचले आहेत.
या गावात गेल्या तीन दिवसांत 499 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Genelia D’Souza Deshmukh | चित्रपटातील किसिंग सीनबाबात अभिनेत्री जेनेलिया देखमुखने मांडले मत

Janhvi Kapoor And Varun Dhawan | जान्हवी व वरुण धवनच्या हॉट फोटोशुटने सोशल मीडियाचे तापमान वाढले; रोमॅंटिक पोजमधील फोटो व्हायरल