Homeताज्या बातम्याKhel Ratna Award | नीरज चोपडा आणि क्रिकेटर मिताली राजसह क्रीडा जगतातील...

Khel Ratna Award | नीरज चोपडा आणि क्रिकेटर मिताली राजसह क्रीडा जगतातील ‘या’ 11 दिग्गजांचे ’खेलरत्न’ पुरस्कारासाठी नामांकन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Khel Ratna Award | 2020 टोकिओ ऑलंपिकमध्ये इतिहास रचणारा गोल्डन बॉय नीरज चोपडा आणि याच इव्हेंटमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारा पहिलवान रवी दहियासह क्रीडा जगतातील 11 दिग्गजांचे ’खेलरत्न’ अवार्डसाठी (Khel Ratna Award) नामांकन केले आहे. या यादीत बॉक्सर लवलीना बोरगोहेन, हॉकी खेळाडू पी श्रीजेश आणि महिला क्रिकेटर मिताली राजचे सुद्धा नाव आहे.

 

टोकिओ ऑलंपिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकणारी महिला मुष्टियोद्धा बोरगोहेन, अनुभवी हॉकी गोलकीपर पी.आर. श्रीजेश आणि महिला कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज यांच्या नावाची शिफारस सुद्धा निवड समितीने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी केली. दिग्गज फुटबॉलर सुनील छेत्री या सन्मानासाठी निवडण्यात आलेला पहिला फुटबॉलर आहे.

 

मागील वर्षी पाच खेळाडूंना खेलरत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आले तर 2016 रियो खेळानंतर चार खेळाडूंना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते.
टोकिओ पॅरालंपिक (24 ऑगस्टपासून पाच सप्टेंबर) मध्ये भाग घेणार्‍या खेळाडूंच्या कामगिरीवर सुद्धा विचार करण्यासाठी राष्ट्रीय खेळ पुरस्काराच्या घोषणेत (Khel Ratna Award) उशीर करण्यात आला.

 

टोकिओ पॅरालंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे नेमबाज अवनी लेखरा आणि मनीष नरवाल, भालाफेक खेळाडू सुमित अंतिल आणि बॅडमिंटन खेळाडू प्रमोद भगत आणि कृष्णा नागरला सुद्धा खेलरत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आले.
समितीने अर्जुन पुरस्कारासाठी 35 खेळाडूंना निवडले जे मागील वर्षी पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंच्या संख्येपेक्षा आठ जास्त आहेत.

 

क्रिकेटर शिखर धवन, पॅरा टेबल टेनिस खेळाडू भाविना पटेल, पॅरा बॅडमिंटन खेळाडू सुहास यथीराज आणि उंच उडीतील निषाद कुमार अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये सहभागी आहे. ऑलंम्पिकमध्ये ऐतिहासिक कास्य पदक जिंकणार्‍या भारतीय पुरुष हॉकी टीमच्या सदस्यांना सुद्धा अर्जुन पुरस्कार दिला जाईल.

 

हे आहेत ते ’खेल रत्न’ पुरस्करासाठी नामांकित 11 खेळाडू

 

1. नीरज चोपडा (अ‍ॅथलेटिक्स)

 

2. रवी दहिया (कुस्ती)

 

3. पी.आर. श्रीजेश (हॉकी)

 

4. लवलीना बोरगोहेन (मुष्टीयोद्धा)

 

5. सुनील छेत्री (फुटबॉल)

 

6. मिताली राज (क्रिकेट)

 

7. प्रमोद भगत (बॅडमिंटन)

 

8. सुमित अंतिल (भालाफेक)

 

9. अवनी लेखारा (शूटिंग)

 

10. कृष्णा नगर (बॅडमिंटन)

 

11. एम. नरवाल (शुटिंग)

 

Web Title : Khel Ratna Award | these 11 sports luminaries including golden boy neeraj chopra cricketer mithali raj and football legend sunil chhetri were nominated for the khel ratna award

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Platelet Count | प्लेटलेट काऊंट वेगाने वाढवतात ‘या’ गोष्टी, डेंग्यूसारख्या आजारात ‘या’ 5 चूका टाळा

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषदांमधील सदस्य संख्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Nawab Malik | नवाब मलिकांना रोखण्यासाठी याचिका, ‘या’ विनंतीवर हायकोर्ट म्हणाले… 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News