Nawab Malik | नवाब मलिकांना रोखण्यासाठी याचिका, ‘या’ विनंतीवर हायकोर्ट म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरण (Cruise Drugs Party Case) समोर आल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) हे सातत्याने एनसीबी (NCB) आणि एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतानाच या अनुषंगाने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात एक जनहित याचिका आज मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) दाखल करण्यात आली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्याची याचिकादाराने विनंती केली होती, परंतु कोर्टाने ही विनंती अमान्य केली.

 

नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद टोकाला गेलेला असताना वानखेडे कुटुंबाच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील (Washim district) रिसोड तालुक्यातील वरुड तोफा (Warud Topha) गावचे गावकरी पुढे आले आहेत. उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन या याचिकेतून समीर वानखेडे यांच्यावर नबाव मलिक (Nawab Malik) यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला आळा घालण्याची मागणी करण्यात आली. मात्र, यावर तात्काळ सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिला.

 

मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता (Chief Justice Dipankar Datta) आणि न्यायमूर्ती एमएस कर्णिक (Justice MS Karnik) यांच्या खंडपीठासमोर एक व्यवसायीक आणि मौलाना असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने संबंधित याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी केली होती. यावर न्यायालयाने दिवाळीपर्यंत वाट पाहण्याची किंवा व्हॅकेशन खंडपीठाकडे (vacation bench) जाण्याची सूचना याचिकाकर्त्याला केली आहे.

अधिवक्ता अशोक सरावगी (Advocate Ashok Saravgi) यांच्या माध्यमातून दाखल याचिकेत,
मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांच्याकडून तपास यंत्रणांचे मनोबल खच्ची करण्याच्या उद्देशाने केलेल्या
टिपण्णींना आळा घालणे किंवा थांबवण्याची मागणी करण्यात आली.
तसेच समीर वानखेडे आमि त्यांच्या कुटुंबीयांवरही व्यक्तीगत हल्ला न करण्याच्या सूचना मलिक यांना देण्याची मागणी करण्यात आली.

 

Web Title :- Nawab Malik | aryan khan drugs curb nawab maliks criticism ncb officer sameer wankhede file petition high court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stock | शॉर्ट टर्ममध्ये कमाईची मोठी ‘सुवर्ण’संधी ! ‘या’ स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा तज्ज्ञांचा सल्ला

Sameer Wankhede | ‘मी दलित, माझे पूर्वज हिंदू, मग मुलगा मुसलमान कसा झाला’; समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव

7th Pay commission | दिवाळीपूर्वी येणार महागाई भत्त्याचा एरियर, समजून घ्या ऑक्टोबरच्या वाढीव पगाराचे गणित