Platelet Count | प्लेटलेट काऊंट वेगाने वाढवतात ‘या’ गोष्टी, डेंग्यूसारख्या आजारात ‘या’ 5 चूका टाळा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Platelet Count | प्लेटलेट्स लेव्हल शरीरात मेंटेन राहणे खुप आवश्यक आहे. मात्र, काही लोकांना थ्रोम्बोसायटोपेनिया होतो किंवा डेंग्यूसारख्या आजारात शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात ज्या वाढवणे खुप आवश्यक असते. (how to increase platelet count) डॉक्टर्स म्हणतात की, शरीरातील प्लेटलेट्स काऊंट दिड ते साडेचार लाख असावे.

 

फोलेट, व्हिटॅमिन-बी12, व्हिटॅमिन -सी, व्हिटॅमिन-डी आणि व्हिटॅमिन-के युक्त वस्तू प्लेटलेट काऊंट वाढवू शकतात. प्लेटलेट काऊंट नॅचरली कसे वाढवता येऊ शकते (how to increase platelet count) आणि यामध्ये कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते जाणून घेवूयात…

1. फोलेट रिच फूड : Folate rich food
रक्तपेशींसाठी फोलेट एक आवश्यक व्हिटॅमिन-बी आहे. फोलिक अ‍ॅसिड फोलेटचे सिंथेटिक रूप आहे. प्रौढांना दिवसभरात 400, गरोदर महिलांना 600 मायक्रोग्राम फोलेटची गरज असते. हिरव्या पालेभाज्या म्हणजे पालक किंवा ब्रसेल्स स्प्राउट, चवळी, तांदूळ आणि यीस्ट सारख्या गोष्टी फोलेटची (Platelet Count) कमतरता पूर्ण करतात.

 

2. व्हिटॅमिन-बी12 : Vitamin-B12
शरीरात लाल रक्तपेशी बनवण्यासाठी व्हिटॅमिन-बी12 आवश्यक असते. बदाम दूध, सोया मिल्क, अंडे, मोठे शिंपले, ट्राउट, सालमन आणि टूना फिश याची भरपाई करते. डेयरी प्रॉडक्टमध्ये सुद्धा व्हिटॅमिन-बी12 असते, परंतु गाईचे दुध प्लेटलेट वाढवण्यात अडचण निर्माण करते.

 

3. व्हिटॅमिन-सी : Vitamin-C
इम्युन फंक्शन व्यवस्थित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्वाची भूमिका पार पाडते. तसेच आयर्न शोषण करण्यासाठी मदत करते. यासाठी ब्रोकली, ब्रसेल्स स्प्राउट, आंबट फळे, शिमला मिरचीचे सेवन करा.

 

4. व्हिटॅमिन-डी : Vitamin-D
व्हिटॅमिन-डी हाडांचे फंक्शन, मांसपेशी, नर्व्हस आणि इम्यून सिस्टमसाठी खुप आवश्यक मानले जाते. प्लेटलेट्स डिसॉर्डर सपोर्ट एसोसिएशननुसार, व्हिटॅमिन-डी अस्थी मज्जाच्या फंक्शनसाठी आवश्यक आहे. यासाठी मांसाहारी असाल तर अंड्याचा पिवळा भाग, फॅटी फिश, सालमन-टुना फिश, फिश लिव्हर ऑईल आणि दूध-दही सेवन करा. शाकाहारी लोक कडधान्य, संत्रे, सोया मिल्क किंवा योगा, मशरूम सेवन करू शकतात.

 

5. व्हिटॅमिन-के : Vitamin-K
हाडांच्या मजबूतीसाठी व्हिटॅमिन-के खुप आवश्यक असते. PDSA च्या सर्वेनुसार, व्हिटॅमिन-के च्या सेवनाने 26.98 टक्के लोकांच्या प्लेटलेट काऊंट आणि ब्लीडिंग संबंधी लक्षणात सुधारणा दिसून आली आहे. शरीरातील याची कमतरता पूर्ण करण्यासाठी सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या, बीट, पालक आणि केळे, ब्रोकली किंवा दूधी भोपळा सेवन करा.

 

6. आयर्न : Iron
लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट काऊंटसाठी आयर्न महत्वाचे आहे. अ‍ॅनिमिया ग्रस्त लोकांमध्ये आयर्न प्लेटलेट काऊंट वाढवू शकते. शरीरात आयर्नच्या वाढीसाठी ऑयस्टर्स, धान्य, राजमा, डार्क चॉकलेट, डाळ किंवा टोफू सेवन करावे.

 

या वस्तू खाणे टाळा :

1. अल्कोहोलयुक्त पदार्थ

2. आर्टिफिशियल स्वीट ड्रिंक्स

3. क्रॅनबेरी ज्यूस

4. टॉनिक वॉटर

5. कडू लिंबातील क्विनाईन तत्व

 

* उंदरांवरील संशोधनानुसार पपईची पाने सुद्धा प्लेटलेट काऊंट आणि लाल रक्तपेशी वाढवण्याचे काम करतात. परंतु मनुष्याच्या बाबतीत अजून यावर संशोधन होणे बाकी आहे. (Platelet Count)

 

Web Title :- Platelet Count | how can platelet count increase with natural foods

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

School Diwali Holiday | महाराष्ट्रातील शाळांना शिक्षणमंत्र्यांकडून दिवाळीची सुट्टी जाहीर

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषदांमधील सदस्य संख्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Multibagger Stock | शॉर्ट टर्ममध्ये कमाईची मोठी ‘सुवर्ण’संधी ! ‘या’ स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा तज्ज्ञांचा सल्ला