TikTok वर दिसली कियारा आडवाणीची ‘डुप्लीकेट’, इंटरनेटवर जोरदार ‘चर्चा’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लोकांमध्ये टिकटॉकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक लोक टिकटॉक व्हिडीओ बनवतात आणि शेअर करतात. टिकटॉक वर असेही काही लोक आढळतात जे हुबेहूब बॉलिवूड सेलिब्रिटींसारखे दिसतात. असंच काहीसं पुन्हा एकदा झालं आहे. सध्या बॉलिवूड स्टार कियारा आडवाणीसारखी दिसणारी एक टिकटॉक स्टार सोशलवर गाजताना दिसत आहे. याआधीही करीना कपूर, श्रीदेवी, ऐश्वर्या रॉय, काजोल यांच्यासारख्या दिसणाऱ्या अनक व्यक्ती सोशलवरून आतापर्यंत समोर आल्या आहेत. सध्या कियारा आडवाणीच्या या डुप्लीकेटची खूप चर्चा होताना दिसत आहे.

कियारा आवडवाणी सारख्या दिसणाऱ्या या मुलीचं नाव कल्पना शर्मा आहे. तिनं सेम कियारासारखाच लुक केला आहे. तिच्या स्टाईलमध्ये ती एक्सप्रेशन देताना दिसत आहे. कबीर सिंगमधील प्रीतीचा रोल साकारणाऱ्या कियाराची स्टाईल कॉपी करून कल्पना चर्चेत येताना दिसत आहे. कल्पनाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात कल्पना प्रीती प्रमाणेच म्हणजेच कबीर सिंगमधील कियाराप्रमाणे व्हाईट ड्रेस आणि व्हाईट ओढणीत आहे. कियारच्या कबीर सिनेमातील काही डायलॉग्सवर ती ॲक्टींग करताना दिसत आहे. कल्पानाचं हे व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत. सध्या कल्पनाचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.