Kiara Advani | चाहत्यांना ‘ही’ अभिनेत्री वाटते ‘इंडियन बार्बी’; पिंक कलरच्या आऊटफिटमधील फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सर्वत्र हॉलीवुडच्या चित्रपटांची (Hollywood Movies) चर्चा आहे. तसेच बहुचर्चित हॉलीवुडचा एक चित्रपट म्हणजे बार्बी (Barbie Movie) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आता एका बॉलीवुड अभिनेत्रीला देखील तिचे चाहते ‘इंडियन बार्बी’ (Indian Barbie) असे बोलत आहेत. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) हिच्या एका फॅशनमुळे तिला चाहत्यांनी ‘इंडियन बार्बी’ हे नाव दिले असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री कियारा (Kiara Advani) ही एका फॅशन शोमध्ये पिंक रंगाच्या सुंदर डिझायनर ड्रेसमध्ये दिसून आली.

अभिनेत्री किय़ारा आडवाणी ही सध्या यशाच्या शिखरावर आहे. कियाराची गणना बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जात आहे. कियाराने एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट (Kiara Advani Superhit Movie) दिले आहेत. कियाराचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अभिनेत्री कियारा आडवाणी हिने फाल्गुनी आणि शेन मयूर यांच्या फॅशन शो (Falguni And Shane Mayur Fashion Show) मध्ये जबरदस्त रॅम्प वॉक केला. यावेळी कियाराने सुंदर पिंक रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. सिक्वेन्सच्या या ड्रेसमध्ये कियाराचे सौंदर्य अधिक खुलले होते. यावेळी तिने रिव्हिलिंग ब्लाऊज व कट असलेला फ्लोर टच स्कर्ट स्टाईल केला होता. कियाराचा रॅम्प वॉक बघून चाहते खूश झाले होते. रॅम्प वरुन कियाराने तिच्या उपस्थित सासूला फ्लाईंग किस देखील दिली. अभिनेत्री कियारा रॅम्प वॉक वरील (Kiara Advani Ramp Walk) अंदाज चाहत्यांना खूप आवडला.

अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) हिचा चाहता वर्ग लाखोंमध्ये आहे. तिचा पिंक कलरच्या आऊटफिटमधील लूकवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस केला. यावेळी तिला अनेकांनी प्रेमाने ‘इंडियन बार्बी’ असे म्हटले आहे. अभिनेत्री कियारा आडवाणी हिचा काही दिवसांपूर्वी ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता लवकरच तिचा ‘गेंमचेंजर’ चित्रपट (Game Changer Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 2000 रुपये लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Population Of Pune | पुणे शहराची लोखसंख्या 2047 पर्यंत पोहोचणार 1 कोटींवर !
पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची चिन्हे