Population Of Pune | पुणे शहराची लोकसंख्या 2047 पर्यंत पोहोचणार 1 कोटींवर ! पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची चिन्हे

पुणे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून आली माहिती समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Population Of Pune | पुणे महापालिकेची Pune Municipal Corporation (PMC) हद्द ५१९ चौ.कि.मी. झाली असून लोकसंख्या ६० लाखांपर्यंत पोहोचली आहे. सध्याचा जननदर आणि स्थलांतरणाचा वेग पाहता २०४७ पर्यंत लोकसंख्या १ कोटींच्या घरामध्ये पोहोचेल. महापालिकेच्यावतीने समान पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असली तरी शहरातील १० टक्के निवासी भागामध्ये आताच पिण्याची पाण्याची समस्या असून भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता पाणी पुरवठ्याचे नवीन पर्याय न शोधल्यास निम्म्या पुणेकरांसमोर पाण्याचे संकट (Pune Water Crisis) उभे राहाण्याची शक्यता असल्याची बाब महापालिकेने आज सर्वसाधारण सभेपुढे मांडलेल्या पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०२१-२२ मधून समोर येत आहे. (Population Of Pune)

महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये शहरातील वापरातील जमीन, लोकसंख्या, रस्ते व वाहनांचे प्रमाण, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, उद्याने, हवामान, पर्यावरणाची सद्यस्थिती, महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणार्‍या योजना आणि भविष्यातील योजना यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यासंदर्भात देण्यात आलेल्या आकडेवारीवरून भविष्यातील पुणे शहराचे चित्र दिसत आहे. (Population Of Pune)

महापालिका हद्दीमध्ये २३ गावे समाविष्ट झाल्यानंतर क्षेत्रफळ ५१९ चौ.कि.मी. झाले आहे. समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याचे काम सुरू असून तेथेही एकात्मिक विकास नियमावली लागू झाली आहे. पुणे शहरातील शिक्षण संस्था आणि उद्योगांमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरीतांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रालाही चांगले दिवस आले आहेत. भौगोलिक स्थितीमुळे शहरातील पाणी पुरवठ्याच्या नियोजनात अडथळे येत आहे. सुमारे १० टक्के लोकसंख्येला पाण्याची चणचण भासते. भविष्यात उपनगरे आणि समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची चिन्हे दिसत असून या लोकसंख्येला पाणी पुरवठा करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.

शहराचा विस्तार आणि भविष्यातील लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात रस्त्यांची संख्या अपुरी आहे. अशातच वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून ती ३५ लाखांवर पोहोचली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएमएल अधिक मजबूत करण्यासाठी नवीन बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. त्याचवेळी मेट्रोचे नवीन मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. भविष्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबुतीने उभी करण्याची गरज असल्याचे या अहवालातून ठळकपणे जाणवत आहे.

पर्यावरण अहवालातील ठळक बाबी

*शहरात २६३ पक्षांच्या प्रजातींचे पक्षी आढळून आल्या आहेत.

  • शहरात सुमारे २२०० (९५० टन ओला कचरा)टन कचरा निर्माण होत
    असून १०० टक्के कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक वापराबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे.
  • २०२२ मध्ये शिवाजीनगर आणि हपडपसर भागामध्ये हवेचे प्रदूषण अधिक नोंदले गेले.
  • चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतील १५५० कि.मी. जलवाहीनीपैकी ८३० कि.मी.चे काम पूर्ण. ट्रान्समिशनच्या कामामधील ११५ कि.मी. पैकी ७३ कि.मी.चे काम पूर्ण. १,१९,७४६ वॉटर मिटर बसविण्यात आले.

  • बांधकामांसाठी एसटीपी प्लांटमधील प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • शहरातील विजेचा वापर ४४६३.५९ मिलियन युनीटवरून ४९८२.८९ मि.यु.पर्यंत वाढला.
  • कार्बन उत्सर्जन, ग्रीन हाउन गॅस व वातावरण बदल या विषयावर काम
    करण्यासाठी शहराचा क्लायमेट ऍक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे.
    यासाठी तज्ञांचा समावेश असलेल्या क्लायमेट ऍक्शन सेल स्थापन करण्यात येत आहे.
  • माजी वसुंधरा स्पर्धेत शहराला तृतीय क्रमांक.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरडी हटवण्यासाठी पुन्हा ब्लॉक,
उद्या (गुरूवारी) ‘या’ वेळेत प्रवास टाळा