ACB Trap News | 2000 रुपये लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap News | Head Constable in anti-corruption net while accepting Rs 2000 bribe

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून तक्रारदाराच्या आई-वडिलांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी व अदखलपात्र गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) अंबड पोलिस ठाण्याच्या (Ambad Police Station) हेडकॉन्स्टेबलला (Head Constable) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले. एसीबीने (ACB Trap News) ही कारवाई बुधवारी (दि.26) दुपारी अंबड रोडवरील पृथ्वीराज बार अँड रेस्टॉरंट येथे केली. महादू अप्पाराव पवार Mahadu Apparao Pawar (वय-56 रा. नाव्हा ता.जि. जालना) असे ताब्यात घेतलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे.

याबाबत 27 वर्षीय व्यक्तीने जालना एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदाराविरुद्ध अंबड तालुक्यातील कर्जत येथे शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून 20 जुलै 2023 रोजी अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (FIR) दाखल झालेला आहे. त्यामध्ये तक्रारदारांच्या आई-वडील यांच्यावर महादू पवार यांनी प्रतिबंधक कार्यवाई (Preventive Action) केलेली होती. तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी महादू पवार यांनी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याची तक्रार जालना एसीबीकडे (Jalna ACB Trap) केली. यावरून बुधवारी एसीबीने जालना शहरातील अंबडवरील पृथ्वीराज बार अँड रेस्टॉरंट मध्ये सापळा लावला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून महादू पवार यांनी पंचांसमक्ष दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. याप्रकरणी जालना तालुका पोलिस ठाण्यात (Jalna Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे (DySP Kiran Bidve)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर
(PI Shankar Mutekar) पोलीस अंमलदार गजानन कांबळे,
जावेद शेख, शिवाज जमधडे, गजानन घायवट, कृष्णा देठे, गणेश बुजाडे,
ज्ञानदेव झुंबड, आत्माराम डोईफोडे, गजानन खरात, संदीप लहाने,
विठ्ठल कापसे, प्रवीण खंदारे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Population Of Pune | पुणे शहराची लोखसंख्या 2047 पर्यंत पोहोचणार 1 कोटींवर !
पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची चिन्हे

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरडी हटवण्यासाठी पुन्हा ब्लॉक,
उद्या (गुरूवारी) ‘या’ वेळेत प्रवास टाळा

Total
0
Shares
Related Posts
Pune PMC News | Katraj Kondhwa road work to be completed by March 2026 by acquiring land as per special law; Decision taken in meeting with District Collector - Information from Municipal Commissioner Naval Kishore Ram

Pune PMC News | विशेष कायद्यानुसार भूसंपादन करून कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करणार; जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत निर्णय – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती