थिएटरमध्ये रिलीज होणार कियारा आडवाणीचा ‘इंदू की जवानी’ ! समोर आली रिलीज डेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी (Laxmii) हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 9 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. कंचना (Kanchana) या मूळ तमिळ सिनेमाचा तो रिमेक आहे. लक्ष्मीनंतर आता कियाराचा आणखी एक सिनेमा रिलीज होत आहे. कियाराचा इंदू की जवानी हा सिनेमा पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. कियारादेखील तिच्या सिनेमाला घेऊन खूप एक्साईटेड आहे.

कियारा आडवाणीचा इंदू की जवानी हा सिनेमा 11 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कारण आता कोरोना व्हायरस लॉकडाउननंतर हळूहळू थिएटर्स सुरू होत आहेत. बॉलिवूडमधील ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यानंही ट्विट करत सिनेमाच्या रिलीजबद्दल सांगितलं आहे.

इंदू की जवानी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात ती आदित्य सील (Aditya Seal) सोबत दिसणार आहे. अबीर सेनगुप्ता यानं या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. कियारानं सोशलवर सिनेमाचं प्रमोशन केलं आहे.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुड न्यूजनंतर आता तिच्यकडे अनेक सिनेमे आहेत. कियारा इंदू की जवानी, भूल भुलैया 2 आणि शेरशाह अशा अनेक मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे जुग जुग जियाे हा सनेमाही आहे. नुकताच तिचा लक्ष्मी हा सिनेमा रिलीज ओटीटीवर रिलीज झाला. गुड न्यूजनंतर कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी सिनेमात पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत.