Kidney Disease | किडनीच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये केळीसह ‘या’ 8 गोष्टी, गंभीर होईल आजार; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kidney Disease | शरीराच्या योग्य कार्यासाठी किडनी (Kidney) योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. रक्त स्वच्छ ठेवणे, शरीरातील टाकावू पदार्थ काढून टाकणे, हार्मोन्स तयार करणे, मिनरल आणि द्रव यांचे संतुलन राखणे ही कामे किडनी करते. किडनीच्या आजारासाठी (Kidney Disease) अनेक जोखीम घटक आहेत (Risk Factors For Kidney Disease).

 

याची सर्वात सामान्य कारणे म्हणजे मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाब (High Blood Pressure), मद्यपान (Alcoholism), हृदयरोग (Heart Disease), हिपॅटायटीस सी (Hepatitis C) आणि एचआयव्ही (HIV) ही देखील किडनीच्या आजाराची प्रमुख कारणे आहेत.

 

किडनीचा आजार कसा टाळावा (How To Prevent Kidney Disease) –
किडनी खराब झाल्यावर ती नीट काम करू शकत नाही आणि त्यामुळे रक्तात टॉक्सिन (Toxin) जमा होऊ लागते. आहारात काही गोष्टींची काळजी घेतल्यास किडनीचे कार्य सुधारता येते. किडनीचा आजार (Kidney Disease) टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते जाणून घेवूयात…

 

1. संत्री आणि संत्र्याचा ज्यूस (Oranges And Orange Juice) –
संत्री आणि संत्र्याच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) चांगल्या प्रमाणात असते. संत्री पोटॅशियमने (Potassium) समृद्ध आहे. एका मोठ्या संत्र्यामध्ये 333 मिलीग्राम पोटॅशियम असते. त्याच वेळी, 1 कप संत्रा ज्यूसमध्ये 473 मिलीग्राम पोटॅशियम असते.

 

पोटॅशियमचे प्रमाण लक्षात घेता, किडनीच्या रुग्णांना संत्री कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याऐवजी तुम्ही द्राक्षे (Grapes), सफरचंद (Apple) आणि क्रॅनबेरी (Cranberry) खाऊ शकता आणि त्याचा ज्यूस पिऊ शकता. त्यात पोटॅशियमचे प्रमाण कमी असते.

 

2. लोणचे आणि चटण्या (Pickles And Chutney) –
लोणचे (Pickles) आणि मसालेदार चटण्यांमध्ये (Spicy Chutney) भरपूर मीठ असते. ते तयार करण्यासाठी भरपूर सोडियम (Sodium) वापरले जाते. ते शरीराचे खूप नुकसान करते. विशेषतः किडनीच्या रुग्णांनी लोणचे आणि चटण्या अजिबात खाऊ नयेत किंवा खुप कमी खाव्यात.

3. बटाटा आणि रताळे (Potatoes And Yams) –
एका मध्यम आकाराच्या भाजलेल्या बटाट्यामध्ये 610 मिलीग्राम पोटॅशियम असते, तर सरासरी आकाराच्या भाजलेल्या रताळ्यामध्ये 541 मिलीग्राम पोटॅशियम असते. बटाट्याचे लहान, पातळ तुकडे करून त्यांना किमान 10 मिनिटे उकळवून पोटॅशियमचे प्रमाण सुमारे 50% कमी केले जाऊ शकते. बटाटे (Potatoes) शिजवण्यापूर्वी किमान 4 तास पाण्यात भिजवून ठेवल्याने पोटॅशियमचे प्रमाण कमी होते.

 

4. केळी (Banana) –
केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, मात्र त्यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. 1 मध्यम आकाराच्या केळीमध्ये 422 मिलीग्राम पोटॅशियम असते. तुम्हाला किडनीची समस्या असल्यास पोटॅशियमचे सेवन मर्यादित करा.

 

बहुतेक ट्रॉपिकल फ्रुट्समध्ये (Tropical Fruits) पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते परंतु अननसात पोटॅशियमचे प्रमाण कमी असते, त्यामुळे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.

 

5. दुग्ध उत्पादने (Dairy Products) –
दुग्धजन्य पदार्थ विविध जीवनसत्त्वे (Vitamins) आणि पोषक तत्वांनी (Nutrients) समृद्ध असतात. ही उत्पादने फॉस्फरस (Phosphorus), पोटॅशियम आणि प्रोटीनचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने किडनीच्या रुग्णांच्या हाडांना इजा होते.

 

जेव्हा किडनी खराब होते तेव्हा रक्तामध्ये जास्त प्रमाणात फॉस्फरस तयार होतो, ज्यामुळे हाडांमधून कॅल्शियम खेचणे सुरू होते. त्यामुळे हाडे पातळ आणि कमकुवत होतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो.

 

6. डार्क कलरचा सोडा (Dark Soda) –
कॅलरी (Calories) आणि साखर (Sugar) व्यतिरिक्त, डार्क कलरच्या सोड्यामध्ये फॉस्फरस देखील असतो.
फॉस्फरसचा वापर अनेक खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये त्यांची चव वाढवण्यासाठी,
त्यांचा रंग स्थिर करण्यासाठी आणि त्यांचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी केला जातो.

 

नैसर्गिकतेच्या तुलनेत शरीर या प्रकारच्या फॉस्फरसचे अधिक शोषण करते.
त्यामध्ये भरपूर मीठ (Salt) असते जे आतड्यात जमा होते. यासाठी डार्क कलरचा सोडा टाळावा.

7. कॅन्ड फूड्स (Canned Foods) –
कॅन्ड फूड्स म्हणजे डबाबंद खाद्यपदार्थ जसे की सूप (Soup), भाज्या (Vegetables) आणि
सोयाबीनचे पदार्थ (Soybean Meal) किफायतशीर असतात आणि बनवण्याची कटकट नसते.
मात्र, बहुतेक कॅन्ड पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते कारण ते प्रिझर्व्हेटीव्ह म्हणून वापरले जाते.
हाय सोडियममुळे, ते मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

8. होल व्हीट ब्रेड (Whole Wheat Bread) –
गव्हाच्या ब्रेडमध्ये फायबरचे (Fiber) प्रमाण जास्त असते आणि तो खूप आरोग्यदायी मानला जातो.
मात्र, किडनी रुग्णांनी तो काळजीपूर्वक निवडावा. व्हाईट ब्रेडपेक्षा होल व्हीट ब्रेडमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्त असते.
त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी तो कमी खावा.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Disease | renal diet foods to avoid if you have kidneys problem
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police News | पोलीस कर्मचाऱ्याने स्वत: वरच गोळी झाडून केली आत्महत्या, सुसाईड नोट आढळली; प्रचंड खळबळ

 

Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांवर FIR, जाणून घ्या का दाऊद इब्राहिमचे नाव आले समोर

 

Ajit Pawar | ‘…तर महापालिकेच्या निवडणुका लगेचच होऊ शकतात, निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार’ – अजित पवार