Kidney Disease Symptoms | ‘हे’ संकेत सांगतात की किडनी होतेय खराब, लक्षणे दिसताच सर्वप्रथम करा ‘हे’ काम; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – किडनीचे नुकसान (Kidney Disease Symptoms) करणारे घटक, किडनीशी संबंधित आजार आणि ती कशी निरोगी ठेवावी याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक किडनी दिन साजरा केला जातो. हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे किडनीच्या आरोग्याची (Kidney Health) काळजी घेणे अत्यंत आवश्यक (Kidney Disease Symptoms) आहे.

 

किडनी शरीरात अनेक प्रकारे काम करते. रक्तातील टाकाऊ पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि अशुद्धता फिल्टर करणे आणि काढून टाकणे हे तिचे मुख्य कार्य आहे. फिल्टर केल्यानंतर, हे सर्व टाकाऊ पदार्थ ब्लॅडरमध्ये (Bladder) जमा होतात आणि नंतर लघवीद्वारे (Urine) बाहेर पडतात.

 

किडनीच्या आरोग्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. अनेकांना किडनीच्या समस्येबद्दल (Kidney Problems) शेवटी कळते, तोपर्यंत त्यांची किडनी खराब झालेली असते. पण अशी काही चिन्हे देखील आहेत, ज्यामुळे किडनी नीट काम करत नसल्याचे लवकर समजू शकते आणि तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांकडे जाता येईल.

 

किडनीच्या आजाराची लक्षणे (Symptoms Of Kidney Disease)
किडनी आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही लक्षणे असू शकतात, जी तुम्हाला सामान्य वाटू शकतात. साधारणपणे किडनीच्या आजारात कारण शोधून ते दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. जशी किडनी खराब होते, तशीच किडनीच्या आजाराची लक्षणेही दिसतात.

 

शरीरात भरपूर टाकाऊ पदार्थ किंवा इलेक्ट्रोलाइट्स (Electrolytes) तयार होतात, जे विषसारखे कार्य करू लागतात. ही लक्षणे किडनीच्या आजाराच्या सुरुवातीला उद्भवू शकतात, जी कालांतराने वाढू शकतात. (Kidney Disease Symptoms)

 

1. मळमळ (Nausea)

2. उलट्या होणे (Vomiting)

3. भूक न लागणे (Loss Of Appetite)

4. थकवा – अशक्तपणा (Fatigue – Weakness)

5. झोपेची कमतरता (Lack Of Sleep)

6. वारंवार मूत्रविसर्जन (Frequent Urination)

7. लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता (Inability To Focus)

8. स्नायूंमध्ये पेटके (Cramps In Muscles)

9. पाय आणि घोट्याला सूज येणे (Swelling Of Legs And Ankles)

10 कोरडी त्वचा (Dry Skin)

11. हाय ब्लडप्रेशर (High Blood Pressure)

12. धाप लागणे (Shortness Of Breath)

13. छाती दुखणे (Chest Pain)

किडनीच्या आजाराची कारणे (Cause Of Kidney Disease)
किडनीच्या आजाराची लक्षणे इतर काही आजारांमुळेही असू शकतात. त्यामुळे ही लक्षणे दिसल्याचा अर्थ असा होत नाही की त्याला किडनीचा त्रास आहे. ही इतर काही आजाराची लक्षणे देखील असू शकतात. याबद्दल योग्य माहितीसाठी, सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

जेव्हा एखादा रोग किडनीच्या कार्यामध्ये व्यत्यय आणतो किंवा त्याचे कार्य थांबवतो तेव्हा किडनीचा आजार होतो. अनेक महिने किंवा वर्षे असे होत राहिल्याने किडनी खराब होऊ लागते. किडनीचा आजार होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की :

 

1. टाइप 1 किंवा टाइप 2 मधुमेह (Type 1 or Type 2 Diabetes)

2. हाय ब्लडप्रेशर

3. पॉलीसिस्टिक किडनी रोग (Polycystic Kidney Disease)

4. आनुवंशिक किडनी रोग (Genetic Kidney Disease)

5. वाढलेले प्रोस्टेट (Enlarged Prostate)

6. किडनी स्टोनची समस्या (Kidney Stone Problem)

7. किडनीच्या फिल्टरिंगच्या कंपोनंटमध्ये सूज म्हणजे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस (Glomerulonephritis)

8. किडनीच्या नलिका आणि तिच्या जवळपास सूज म्हणजे इंटरस्टिशियल नेफ्रायटिस (Interstitial Nephritis)

9. काही कॅन्सरसारखी स्थिती ज्यामध्ये लघवी थांबते (Cancer)

10. वेसिकॉरेटेरल म्हणजे ती स्थिती ज्यामध्ये लघवी किडनीत परत येते (Vesicoureteral)

11. किडनी संसर्ग म्हणजे पायलोनेफ्रायटिस (Pyelonephritis)

मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढवणारे घटक (Factor That Increase The Risk Of Kidney Disease)

काही घटक आहेत, जे किडनीचा आजार किंवा त्याच्याशी संबंधित समस्या वाढवू शकतात. त्या घटकांबद्दल देखील जाणून घेवूयात…

1. मधुमेह (Diabetes)

2. उच्च रक्तदाब

3. हृदयरोग (Heart Disease)

4. धुम्रपान (Smoking)

5. लठ्ठपणा (Obesity)

6. जास्त वय (Old Age)

7. औषधांचा वारंवार वापर (Frequent Use Of Drugs)

8. असामान्य किडनी रचना (Abnormal Kidney Structure)

9. गडद रंग असणे, अमेरिकन किंवा आशियाई अमेरिकन असणे

10. कौटुंबिक इतिहास

 

डॉक्टरांना कधी भेटावे (When To Consult A Doctor)
Mayoclinic च्या मते, जर एखाद्या व्यक्तीला किडनीच्या आजाराची लक्षणे अनेक दिवसांपासून दिसत असतील तर त्याने डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवले आणि किडनीच्या त्रासातून बाहेर आलात तर किडनी निकामी (Kidney Failure) होण्यापासून वाचवता येऊ शकते.

 

दुसरीकडे, जर तुम्हाला वर नमूद केल्याप्रमाणे अशी कोणतीही वैद्यकीय स्थिती असेल, ज्यामुळे किडनीला धोका वाढतो, तर त्याबद्दल डॉक्टरांना सांगा, लघवी तपासणी (Urine Test), रक्त तपासणी (Blood Test) इत्यादीद्वारे ते समजू शकते.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Disease Symptoms | kidney disease symptoms causes risk treatment and when to see a doctor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger IT Stock | 7000 रुपयांच्या वर पोहचला टाटा ग्रुपचा ‘हा’ स्टॉक, दिला 67000% पेक्षा जास्त रिटर्न

 

Online Driving Licence Renewal | कामाची बातमी ! उरकून घ्या DL संबंधीत ‘हे’ काम, अन्यथा होईल अडचण

 

IPS Rashmi Shukla | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा दिलासा