Kiff 2022 | अमिताभ बच्चन यांच्या बद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले ‘हे’ मोठे विधान

पोलीसनामा ऑनलाइन : ‘नुकताच कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (Kiff 2022) सुरुवात झाली आहे. या चित्रपट महोत्सवाला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील हजेरी लावली आहे. अमिताभ बच्चन यांनी आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकले आहेत. या महोत्सवाला (Kiff 2022) त्यांनी पत्नी जया बच्चन सोबत हजेरी लावली होती. तर या महोत्सवात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
या महोत्सवात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, “बंगालमधून अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्याची मागणी आम्ही करत आहोत. गेली अनेक वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान दिले आहे. यासाठी ही मागणी आम्ही करणार आहे”. तर या महोत्सवाला (Kiff 2022) शाहरुख खान, शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
WB | Although not officially, but from Bengal, we will raise this demand to honour Amitabh Bacchan with the Bharat Ratna award for his contribution to Indian cinema for such a long time: CM Mamata Banerjee at the inaugural ceremony of the 28th Kolkata International Film festival pic.twitter.com/8rXMVcQ9wp
— ANI (@ANI) December 15, 2022
या सोहळ्याला अमिताभ बच्चन जया बच्चन सोबतच राणी मुखर्जी, अर्जित सिंग आदी मान्यवर मंडळी
उपस्थित होते. या चित्रपट महोत्सवाची सांगता 22 डिसेंबर रोजी होणार आहे.
Web Title :-Kiff 2022 | west bengal cm mamata banerjee demanding bharatratna to actor amitabh bacchan
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | परदेशात व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील व्यावसायिकाला 37 लाखांना गंडा
Pathaan Controversy | दीपिका पदुकोणचा जुना व्हिडीओ व्हायरल; ” रंगाने धर्म निवडला नाही……”
Parag Bedekar Passes Away | मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन