Kirit Somaiya-Sai Resort | साई रिसॉर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी चुकीची माहिती दिली; अधिकाऱ्यांचा खुलासा

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya-Sai Resort | दापोली तालुक्यात मुरुड समुद्रकिनारी असलेला साई रिसॉर्ट अनधिकृत आहे. तसेच या रिसॉर्टची मालकी शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब यांच्याकडे आहे, असा दावा भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. न्यायालयाने हा रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा निकाल देत, रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रिसॉर्ट पाडण्यासाठी निविदा मागविण्यात येत आहेत. पण, आता अधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांच्याबद्दल एक वेगळी माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी प्रशासनाला आणि न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला आहे. (Kirit Somaiya-Sai Resort)

या रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडले जात होते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत होती, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. पण आता अधिकाऱ्यांनी एक अहवाल जारी केला आहे. त्यात समुद्रात रिसॉर्टचे पाणी सोडले जात नाही, असा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या आरोपांत काही तथ्य नाही, असे सांगण्यात आले आहे. (Kirit Somaiya-Sai Resort)

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्ट प्रकरण गेले अनेक दिवस वादात सापडले होते.
किरीट सोमय्या यांनी हे रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे आहे, असा दावा करत आवाज उठवला होता.
त्यानुसार त्यांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
अखेर हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश हाती आल्यावर त्यांनी आनंद साजरा केला होता.
पण, आता अहवालात काही वेगळ्याच गोष्टी समोर येत आहेत.
शुक्रवारी या ठिकाणी महसूल, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाहणी करून गेले असून,
साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात आले नसल्याचे पाहणीत दिसून आले आहे.
या पूर्वीच दापोली उपविभागीय अधिकारी यांनीही शासनाला अहवाल सादर केला होता.
त्यामुळे किरीट सोमय्या यांनी खोटी माहिती दिल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा