Kishori Pednekar | किशोरी पेडणेकर यांना राज ठाकरेंचे नाव घेतल्याशिवाय राहवत नाही, मनसेचा खोचक टोला

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या माजी महापौर (Mumbai Former Mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर मनसे (MNS) सतत आरोप आणि टीका करत असतो. आता पुन्हा एकदा त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (Mumbai Municipal Corporation) हा शब्द देवनागरी किंवा इंग्रजीमध्ये लिहता, वाचता आणि बोलता येत नाही, अशी टीका मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी केली आहे.

मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन हा शब्द देवनागरी किंवा इंग्रजीमध्ये लिहता, वाचता आणि बोलता न येणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना दिवाळीच्या सणात देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव घेतल्याशिवाय राहवत नाही. किंबहूना त्यांना फराळ गोड लागत नाही. त्यांच्या शिल्लक सेनेचे प्रमुख कधी भाजपसोबत (BJP) युती करतात, तर कधी पटले नाही म्हणून स्वतंत्र्य लढतात. भाजपचे सरकार आले की पुन्हा त्यांना पाठिंबा देऊन सत्तेसाठी मंत्रीपदे आपल्या घशात घालतात. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी आजन्म ज्या काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) वैर केले आणि त्यांच्या विरोधात उभे राहिले, त्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संधान बांधतात आणि त्यांच्यासोबत सत्तेत जातात, असे काळे म्हणाले.

मी सत्तेत गेल्यावर शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करेन असे उद्धव ठाकरे म्हणतात.
पण सत्ता आल्यावर स्वत: जाऊन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसतात आणि आदु बाळाला देखील मंत्री करतात.
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर देखील टीका केली.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे एआयएमआयएम (AIMIM) आणि समाजवादी पक्षा सोबत (Samajwadi Party) देखील युतीचे संकेत दिसू लागले आहेत. त्यामुळे त्यांनी एकदा स्वत:च्या घरात पाहावे आणि नंतर इतरांवर टीका करावी.
शिवसेनेला आणि त्यांच्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेने गंभीरपणे घेणे सोडले आहे, असा घणाघात काळे यांनी
केला.

Web Title :- Kishori Pednekar | Kishori Pednekar is not allowed without mention Raj Thackeray’s name, MNS’s scumbag gang

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Police | 2 महिन्याच्या चिमुकलीचे फूटपाथवरुन अपहरण, मुंबई पोलिसांकडून 12 तासांत आरोपीला अटक; बाळ पुन्हा आईच्या कुशीत

MLA Eknath Khadse | बायकोला साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला, एकनाथ खडसेंचा शहाजीबापूंना टोला