Kishori Pednekar | महापालिकायुक्त बंदुकीच्या धाकावर काम करत आहेत, किशोरी पेडणेकर यांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांचे निधन झाल्याने या मतदारसंघात पोटनिवडणुक (Andheri East by-Election) घेण्यात येणार आहेत. पण तत्पूर्वी या ठिकाणी मोठे राजकारण रंगले आहे. शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु आता ऋतुजा लटके यांचा महापालिकेतील नोकरीचा राजीनामा (Resignation) मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या (Shivsena) मुंबईच्या माजी महापौर (Former Mumbai Mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) हे बंदुकीच्या धाकावर काम करत असल्याचा देखील आरोप किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केला आहे.

इक्बाल चहल हे सनदी अधिकारी आहेत. चहल हे कायद्याला धरुन चालतात, असे वाटत होते. कोरोनाच्या काळात त्यांनी प्रशंसनीय काम केले आहे. पण आता ते बंदुकीच्या धाकावर काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे, असा मोठा आरोप किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केला. एका विधवा महिलेने तिच्या पतीचे काम पुढे नेले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा एकनाथ शिंदे सतत उल्लेख करत असतात. पण आता एका महिलेची मुस्कटदाबी का करत आहेत, असा प्रश्न पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना विचारला आहे.

ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray)
गटासोबत आहेत. त्यांची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यांनी प्रशासकीय नियमानुसार राजीनामा दिला आहे.
त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता देखील केली आहे. तसेच एक महिन्याचा पगार देखील त्यांनी जमा केला आहे.
परंतु आता महापालिकेचे अधिकारी नियमबाह्य काम करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार
(Shinde-Fadnavis Government) त्यांच्यावर दबाव आणत आहे.
आणि आयुक्त इक्बाल चहल त्यांना घाबरत आहेत, असा आरोप पेडणेकर यांनी केला आहे.

Web Title :- Kishori Pednekar | kishori pednekar targets shinde fadnavis government over rutuja latke andheri east bypoll

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा