कर बचतीसाठी इन्वेस्टमेंट प्रूफ भरताय ? तर फॉर्म भरताना कोणती खबरदारी घ्यावी ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कर घोषणेमध्ये, लोकांना सर्व प्रकारच्या गुंतवणूकीचे पुरावे द्यावे लागतात, त्या अनुषंगाने कंपनी आपली कर कपात निश्चित करते. पगारातून कर कापला जाऊ नये, म्हणून नोकरदार वर्ग सध्या आपल्या कंपन्यांमध्ये ‘कर घोषणेचे फॉर्म (Tax Declaration Form) भरत आहेत. तर यासाठी कर घोषित केलेल्या फॉर्ममधील गुंतवणूकीचे पुरावे कोणते?, का आवश्यक आहेत? फॉर्म भरताना कोणती खबरदारी घ्यावी? याबाबत सविस्तर माहिती Taxbuddy.com चे संस्थापक सुजित बांगर आणि Tax Expert राज चावला यांनी सांगितली आहे.

गुंतवणूकीचा पुरावा (Investment proof)-

आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यांत गुंतवणूकीचे पुरावे जमा करावे लागतात. प्रामुख्याने ते जानेवारीत भरावे लागतात. गुंतवणूकीच्या पुराव्यात कर बचतीच्या सर्व साधनाची माहितीसह पुरावे देखील सादर करावे लागतात.

फायदा काय.?

इन्वेस्टमेंट प्रूफ थेट कर वजावटीचा स्रोत म्हणजे TDSशी जोडलेला आहे. इन्वेस्टमेंट प्रूफच्या आधारे कमी-जास्त TDS वजा केला जातो. हे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांपर्यंत लागू होते. पुरावे जमा न केल्यास येणाऱ्या पगारावर परिणाम होतो.

गुंतवणूक जाहीरनामा फॉर्म-

आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला गुंतवणूक जाहीरनामा फॉर्म (Investment Declaration Form) भरला जातो. कर्मचारी त्यांच्या मालकास गुंतवणूकीचा जाहीरनामा देतात. जाहीरनामाच्या वेळी आपल्याला पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही, परंतु आपल्याला जानेवारीतच हे पुरावे सादर करणे आवश्यक आहे.

गुंतवणूकीचा पुरावा म्हणून काय सादर कराल?

आयकर कलम ८० सी अंतर्गत केलेल्या कोणत्याही गुंतवणूकीची कागदपत्रे आपण पुरावा म्हणून सादर करू शकतो. कारण ८० सीअंतर्गत केलेल्या गुंतवणुकीला १.५ लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते .

गुंतवणूकीचा पुरावा यादी-

‘जीवन विमा पॉलिसी प्रीमियमची पावती, ULIP प्रीमियमचा पुरावा, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS)मधील गुंतवणूकीचा पुरावा, पीपीएफमधील गुंतवणूकीची पावती, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSS), गृह कर्जाच्या प्रिन्सिपलची परतफेड, दोन मुलांची ट्यूशन फी, कर बचत मुदत ठेव रक्कम, NPS योगदान, सुकन्या समृद्धी योजनेमधील गुंतवणूक, हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवरील सवलत इ.

इन्वेस्टमेंटची घोषणा आणि पुरावे-

गुंतवणूकीच्या घोषणेमध्ये आपण संभाव्य गुंतवणूकीबद्दल माहिती द्या नवीन वित्तीय वर्षात कर बचत करण्याच्या उद्देशाने केलेल्या आपल्या योजनेस गुंतवणूकीची घोषणा (Investment Declaration) म्हणतात. तर गुंतवणूकीचे हे पुरावे वर्षाभरासाठी कर बचतीची साधने आहेत. गुंतवणूकीची किंवा विम्याची पावती तुम्ही वर्षाच्या गुंतवणूकीचा पुरावा म्हणून देऊ शकता.

कर बचत इन्वेस्टमेंट-

प्राप्तिकर कलम ८०C अंतर्गत काही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूकीवर कर माफ करण्यात आला आहे. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS), सुकन्या समृद्धि योजना (SSY), युनिट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट प्लान (ULIP), कर बचत एफडी आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) यासारख्या योजनांमधील गुंतवणूकीचा समावेश आहे. तर आयकर कलम (Income tax clause) ८०D अंतर्गत तुम्हाला वैद्यकीय खर्चावर कर सवलत मिळू शकते. यात स्वत:चा जोडीदार आणि पालक यांच्या वैद्यकीय खर्चावरील सवलत समाविष्ट आहे. कलम ८० G जी अंतर्गत सेवाभावी संस्थांना दिलेल्या देणग्यांना करात सूट मिळते.