LIC Policy : दररोज करा 121 रूपयांची बचत अन् मुलीच्या लग्नावेळी मिळवा 27 लाख रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकजण मुलीचे भावी आयुष्य सुरक्षित करण्यासाठी तिच्या जन्माच्यावेळी गुंतवणूक करण्याला पसंती देतात. आपल्यालाही आपल्या मुलीच्या भविष्याबद्दल काळजी वाटत असेल, तर LIC ची पॉलिसी घेऊ शकता. जी खास मुलीच्या लग्नासाठी तयार केली आहे. LIC कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadan Policy) असे या पॉलिसीचे नाव आहे. या योजनेमध्ये दररोज 121 रुपयांची बचत अर्थात मासिक 3600 रुपयांचा प्रीमियम भरून तुम्ही ही योजना खरेदी करू शकता. यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त किमतीचा प्रीमियमही आपल्याला खरेदी करता येणार आहे.

या वयात ही पॉलिसी उपलब्ध असेल
दररोज 121 रुपयांच्या हिशेबाने तुम्ही जर या योजनेमध्ये गुंतवणूक केली, तर 25 वर्षांनंतर तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील. याशिवाय पॉलिसी खरेदी केल्यानंतर मृत्यू झाल्यास कुटुंबाला या पॉलिसीचा प्रीमियम भरावा लागणार नाही, वार्षिक 1 लाख रुपये मिळतील. याशिवाय 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या नॉमिनीला 27 लाख रुपयेहीदेखील मिळणार आहेत. ही पॉलिसी खरेदी करणाऱ्याचे वय कमीत कमी 30 वर्षे तर मुलीचे वय 1 वर्ष असणे गरजेचे आहे. ही योजना 25 वर्षांची असली तरी, प्रीमियम 22 वर्षांसाठी द्यावा लागेल. मात्र, तुमच्या मुलीच्या वयाच्या मानाने वेगवेगळ्या पद्धतीने ही पॉलिसी खरेदी करता येते. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीचा कालावधी निश्चित केला जातो.

पॉलिसीबद्दल थोडक्यात
1) 25 वर्षांसाठी खरेदी केली जाऊ शकते पॉलिसी
2) 22 वर्षांपर्यंत द्यावा लागेल प्रीमियम
3) दररोज 121 रुपये बचत करून महिना 3600 रुपयांचा प्रीमियम भरता येईल.
4) वीमाधारकाचा मध्येच मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना पैसे भरावे लागणार नाहीत.
5) मुलीला पॉलिसीच्या शिल्लक वर्षापर्यंत प्रतिवर्षाला मिळतील 1 लाख
6) पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर नॉमिनीला मिळतील 27 लाख रुपये
7) यापेक्षा कमी किंवा जास्त प्रीमियमवर पॉलिसी खरेदी करता येईल.