मास्क आहे तर श्वास आहे ! कुठे कोणता मास्क घालावा? ‘या’ 7 चूका कधीही करू नका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसची पहिली लाट असो की, दुसरी, याच्याविरूद्ध ज्या शस्त्राने आपल्याला सर्वात जास्त साथ दिली आहे ते आहे मास्क. काही लोक मास्कविषयी तक्रार करताना दिसतात, पण हॉस्पिटलमध्ये गंभीर आवस्थेत असलेले रूग्ण पाहिले तर अशा तक्रारी कुणीही करणार नाही. हे छोटे पण प्रभावी शस्त्र कुठे आणि केव्हा वापरावे, आणि कोणते वापरावे याबाबत डॉक्टर फहीम युनुस यांनी दिलेली माहिती जाणून घेवूयात…

कोणता मास्क योग्य

घरातून बाहेर पडताना एन95/केएन95 किंवा सर्जिकल मास्क वापरा. हा मास्क तोपर्यंत वापरा जोपर्यंत ढिला होत नाही. ढिला मास्क वापरू नका.

कोणत्या ठिकाणी डबल मास्क आवश्यक

हाय रिस्क असलेल्या ठिकाणी डबल मास्क वापरा. हॉस्पिटल, फॅक्टरी, ऑफिसमध्ये जात असाल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत असाल तर चेहर्‍यावर डबल मास्क वापरा.

कुठे वापरावा सिंगल मास्क?

हाय रिस्क झोनमध्ये सांगितलेली सर्व ठिकाणे सोडून इतर ठिकाणी सिंगल मास्क वापरू शकता. हा मास्क सर्जिकल किंवा कॉटनचा सुद्धा वापरू शकता.

विना मास्क कुठे राहू शकतो

जर तुम्ही संक्रमित नसाल तर आपल्या कुटुंबासोबत असताना मास्क काढू शकता. याशिवाय अशा ठिकाणी फिरत आहात जिथे एकटेच आहात तरीसुद्धा मास्क काढू शकता. कारमध्ये एकटे ड्राईव्ह करत असाल तर मास्क काढू शकता.

मास्क लावताना या चूका करू नका

1  मास्क नाकाच्या खाली घेऊ नका, यामुळे व्हायरस नाकातून शरीरात प्रवेश करू शकतो.

2  मास्क काढायचा असेल तर गळ्यात अडकवू नका, यामुळे मास्क तुमच्या त्वचेच्या संपर्कात येतो आणि संसर्गाचा धोका वाढतो.

3  खाण्या-पिण्यासाठी मास्क काढताना कानातून काढा आणि पुन्हा लावा.

4  मास्क कुठलाही असो दोन्ही कडून वापरण्याची चूक कधीही करू नका. होममेड मास्क असेल तर धुवून पुन्हा वापरा.

5  मास्कच्या बाहेरच्या भागाला स्पर्श करू नका. स्पर्श केला तर सॅनिटायजरने हात स्वच्छ करा.

6  कधीही ओला मास्क चेहर्‍यावर लावू नका. यातून इन्फेक्शन पसरण्याचा धोका असतो.

7  मास्क नेहमी गरम पाणी आणि डिटर्जंटने धुवा आणि खुल्या उन्हात वाळवा.