Good News ! ‘या’ क्षेत्रामध्ये निर्माण होतील 1.2 कोटी नोकर्‍या, ग्रामीण भागाला मिळेल मोठी संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीमुळे देशात नोकर्‍यांचे मोठे संकट निर्माण झाले आहे. लॉकडाऊन दरम्यान लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत तर कोट्यवधींचा रोजगार बुडाला आहे. यादरम्यान डेअरी उद्योगाने नोकरीच्या आशा पल्लवित केल्या आहेत. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केट फेडरेशन लिमिटेड म्हणजे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आर. एस. सोढी यांनी दावा केला आहे की, डेअरी सेक्टर पुढील 10 वर्षात 1.2 कोटी नव्या नोकर्‍या निर्माण करेल.

देशातील डेअरी सेक्टरमध्ये गुंतवणुकीची शक्यता
सोढी म्हणाले, भारत जगाच्या 21 टक्के दुग्ध उत्पादन करतो. तर, भारताचे मिल्क मार्केट 5 टक्केच्या वेगाने वाढत आहे. या तुलनेत जागतिक मिल्क मार्केट 1.8 टक्के वेगाने वाढत आहे. अमूलने परदेशात गुंतवणूक केलेली नाही, कारण मिल्क मार्केट आणि ग्रोथ दोन्ही भारतातच आहे. भारताच्या डेअरी सेक्टरशी संबंधीत अ‍ॅनिमल ब्रीडिंग आणि फीडिंगपासून लॉजिस्टिक आणि पॅकेजिंगपर्यंत गुंतवणुकीची मोठी शक्यता आहे.

10 वर्षात 110 अरब डॉलरचे होईल डेअरी सेक्टर
अमूलचे एमडी म्हणाले, भारतात डेअरी सेक्टर पुढील 10 वर्षात 110 अरब डॉलरचे होईल. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (एआयएमए) च्या ऑनलाईन संवादात त्यांनी म्हटले की, जेथे भारत जगासाठी खाद्य सामुग्री पुरवठादार बनू शकत नाही, तेथे, आम्ही निश्चितपणे संपूर्ण जगाला डेअरी उत्पादनांचा पुरवठा करण्याच्या स्थितीत आहोत. शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाची चांगली किंमत मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही भारतीय बाजारावर जास्त लक्ष देत आहोत. आता भारतीय उद्योग अमेरिका आणि युरोपला निर्यात करण्यात पैसा घालवत आहेत.

शेतकर्‍यांच्या गरिबीला अर्बन लॉबी जबाबदार
सोढी म्हणाले, भारतीय शेतकर्‍यांच्या गरिबीसाठी देशातील अर्बन लॉबी जबाबदार आहे. या लॉबीने हा भ्रम पसरवला आहे की, कृषी उत्पादनांची किंमत वाढवणे अर्थव्यवस्थेला नुकसानकारक आहे. जेव्हा आम्ही दुधाच्या किंमतीत 1 ते 2 रुपये प्रति लीटरची वाढ करतो, तेव्हा हेडलाईन होतात. देशातील तमाम वृत्तपत्र आणि न्यूज चॅनल महागाईचा मुद्दा उचलून धरतात. यानंतर एका पिझ्झावर 400 रुपये खर्च करणारे लोक सुद्धा महागाईच्या नावाने गोंधळ घालू लागतात. यासाठी देशात शेतकर्‍याची स्थिती खराब आहे.