सर्व समाजाला सोबत घेऊन विकास साधा : माजी आमदार कोकाटे

सिन्नर : पोलीसनामा आॅनलाइन – सद्या सोशल मीडियाच्या युगात माणूस इतका स्वत:भोवती हरवून गेला आहे की त्याला आपल्या कुटुंबाचे देखील भान राहत नाही. मात्र, काही लोक सर्व समाजाला सोबत घेऊन चांगली ध्येय गाठतात. त्याचे कार्य सर्वांसाठी पथदर्शी ठरते. त्यामुळे सर्वांनी सर्व समाजाला सोबत घेऊन आपला विकास साधावा, असे प्रतिपादन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले. तालुक्यातील वडांगळी येथे डॉ. झाकीर शेख यांच्या माध्यमातून दिवाळी व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर हनुमान मंदिर व मशिद परिसरात हिंदू मुस्लिम बांधवांनी आयोजित केलेल्या मनोमिलन व स्नेहभोजन कार्यक्रमात ते बोलत होते.
कोकाटे पुढे म्हणाले, माणसाने स्वत:मध्ये असलेले गुण व दोष या बाबत स्वत: आत्मपरीक्षण केले पाहिजे. डॉ झाकीर शेख यांचा खूप मोठा गुण म्हणजे त्यांचा मित्र परिवार खूप मोठा आहे. विशेष म्हणजे सर्व पक्षीय आहे. आजकालच्या ह्या धावत्या युगामध्ये अशा प्रकारचे सामाजिक एकोप्याचे कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. ही काळाची गरज असून, येथील हिंदू मुस्लिम बांधवाच्या मनोमिलनाच्या कार्यक्रमामुळे एक आदर्श, नवी परंपरा ह्या निमित्ताने सुरू झाली.

कार्यक्रमासाठी बाजारसमितीचे माजी सभापती अरुण वाघ, पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवी पगार, बाबा कांदळकर, नवनाथ गडाख, आनंदा कांदळकर, कोंडाजी मामा आव्हाड, डॉ झाकीर शेख, बाळासाहेब वाघ, सुदेश खुळे, रामदास खुळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच नवनाथ मुरडनर, ज्ञानेश्वर मुरडनर, कैलास मुरडनर, विष्णू थोरात, नानासाहेब खुळे, किशोर खुळे,अनिल बकरे, विकास बकरे, संजय कुलथे, संजय वाघमारे, सतीश कडवे, गणेश कडवे, रफिक शेख, यासीर शेख, अलाउद्दीन शेख, शौकद मणियार, सलमान शेख, इम्रान शेख, रियाज शेख, मोसीन मणियार, रेहमान शेख, फारुख शेख, बिलाल शेख, अन्सार पटेल, सोनू पटेल, बाळासाहेब खुळे, नीलेश खुळे, नितीन खुळे, सचिन खुळे, खंडू खुळे, योगेश घोटेकर आदींसह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.

चंद्रपूरात आढळला अश्मयुगीन दगडी हत्याराचा कारखाना