कोळपेवाडी दरोडा: भिकारी बनून केली टेहाळणी, मग टाकला दरोडा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाणाकणाऱ्या कोळपेवाडीतील ज्वेलर्स दुकानावरील दरोड्याचा उलघडा झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकून ज्वेलर्सच्या मालकाचा खून करणाऱ्या टोळीतील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. कुख्यात दरोडेखोर पापड्या उर्फ संजय काळे याच्या टोळीने हा दरोडा टाकला होता. दरोडा टाकण्यापूर्वी पापड्याची सुन कोळपेवाडीत आली होती. तीने एका मंदिरात भिक्षेकरी म्हणून राहून दुकानाची टेहाळणी केली. त्यानंतर टोळीतील २० जणांनी या दुकानावर दरोडा टाकला. दरोडा टाकण्यात आला त्यावेळी पाच जणांच्या हातात गावठी पिस्तूले होती अशी माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिली.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4bffff15-b2ab-11e8-a506-3fb679d9945f’]

कोळपेवाडीतील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकून दुकान मालकाची हत्या करून सोने, चांदीचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील आठ सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीकडून दरोडा टाकण्याची पद्धत उघडकीस आली. कुख्यात दरोडेखोर पापड्या काळे हा राज्यभर सराफाच्या दुकानावर दरोडे टाकतो. या टोळीने औरंगाबाद शहरातील सोन्याचे एक दुकान लुटण्याचा प्लॅन आखला होता. परंतु, त्यात यश आले नाही. टोळीतील सुंदरलाल भोसले याने कोळपेवाडी य़ेथील सराफ दुकानाबाबत पापड्या याला माहिती दिली. कोळपेवाडी येथे दरोडा टाकणे सोपे असल्याची माहिती पापड्या याला मिळाल्यानंतर त्याने वर्धा येथून सून मीनाक्षी राहुल काळे हिला बोलवून घेऊन दुकानाची टेहळणी करण्यास सांगितले होते. मीनाक्षी काळे हिने माहेश्वर मंदिरामध्ये भिक्षा मागण्याचे नाटक करून परिसराची पाहणी केली. तर दरोड्याच्या दिवशी एका महिलेला दिवसभर दुकानाची टेहळणी करताना ग्रामस्थांनी पाहिले होते. तिने दुकानात सोने असल्याचे सांगितल्यानंतर पापड्या काळे, त्याच्या साथीदार पप्पू ऊर्फ प्रशांत भोसले व इतर साथीदार हे कोपरगाव तालुक्यात आले.

कोळपेवाडीपासून दूर १२ ते १५ किमीवर गाड्या लावून ते पायी गटा गटाने दुकानाजवळ आले. पापड्या, पप्पू व इतर तिघे हे गावठी पिस्तूल घेऊन दुकानात घुसल्यानंतर त्यांनी थेट दुकानदारावर गोळ्या झाडल्या. तर दुकानाबाहेर थांबलेल्या काही जणांनी दगडफेक केली. हातबॉम्बसारखे फटाके काही जणांनी फोडून दंगलीसारखी परिस्थिती निर्माण करून दुकानातून सोने लुटले. काही अंतरावर गेल्यानंतर सोने एका पिशवीत भरल्यानंतर इतर साथीदार हे गटा-गटाने पसार झाले, अशी गुन्हे करण्याची या टोळीची पद्धत आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’52ac3797-b2ab-11e8-8b11-7d4afc51d2c5′]

लूट केल्यानंतर सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन अजय काळे व पप्या भोसले हे नगरमध्ये आले होते. नगरमधील बुरुडगाव रोडवरील व पप्या भोसलेच्या घरी त्याचा भाऊ विक्रमकडे बॅग देऊन जवळच एका शेतात लपले होते. तेथे अंगावरील कपडे जाळून टाकून दुसरे कपडे घातले होते. दुसऱ्या दिवशी सोन्याचे बॅग घेऊन पप्या भोसले हा फरारी झाला.

पापड्याची टोळीतील सदस्य
किरण बंडू काळे, पापड्या ऊर्फ संजय काळे (रा. वर्धा), श्रीमंत इश्वर काळे (रा. मिटमिटा, औरंगाबाद), अजय बंडू काळे (नेवासा), सुंदरलाल रंधवा भोसले (रा. कोपरगाव), शहाराम छगन भोसले (नेवासा), जितू रामदास भोसले (गंगापूर, औरंगाबाद), बुच्चा रामदास भोसले (रा. गेवराई, बीड), पप्पू ऊर्फ प्रशांत रजिकऱ्या भोसले (रा. वाळकी नगर), शंकर गोरख भोसले (सिल्लोड, औरंगाबाद), अक्षय संतोष चव्हाण (औरंगाबाद), क्रांती कांतिलाल भोसले, (रा. वजिरखेडा, जालना), लखन शांतिलाल पवार (मिसाळवाडी, उस्मानाबाद), उमेश कांतिलाल पवार, कांतिलाल परावर, राजुकमार नारायण काळे (नेवासा), महेंद्र बाबूशा पवार (बीड), विक्रम रजिकऱ्या भोसले (नगर), अक्षय भीमा जाधव (कोळपेवाडी), मीनाक्षी राहुल काळे (रा. वर्धा) व एक अनोळखी महिला अशी २१ जणांची टोळी आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58df9794-b2ab-11e8-8566-932788d141c9′]

पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, सचिन खामगळ, श्रीधर गुट्टे, सुनील चव्हाण, योगेश गोसावी, दत्ता हिंगडे, मन्सूर सय्यद, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, मल्लिकाजून बनकर, दिगंबर कारखेले, रवींद्र कर्डिले, अण्णा पवार, सचिन अडबल, भागीनाथ पंचमुख, संदीप घोडके यांच्या पथकाने टोळीतील आठ आरोपींना गजांआड केले.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी