Kolhapur Crime News | प्रख्यात उद्योगपती अर्जुन उद्योग समुहाचे प्रमुख संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या, कोल्हापूरसह सीमाभागात खळबळ; धक्कादायक कारण आलं समोर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime News | अल्पावधीत औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात नावलौकिक कमावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समूहाचे (Arjun Group) प्रमुख संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी आपली पत्नी आणि मुलासह शुक्रवारी विष प्राशन केल्यानंतर गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या केल्याची (Committed Suicide) धक्कादायक घटना शनिवारी (दि.24) सकाळी (Kolhapur Crime News) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरसह सीमाभागात खळबळ उडाली आहे. संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ते तणावाखाली गेले होते. यातूनच त्यांनी आपल्या कुटुंबासह जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्यांच्या घराजवळ मोठी गर्दी करत त्यांना गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी संतोष शिंदे यांनी लिहिलेली सुसाईड नोट गडहिंग्लज पोलिसांनी (Gadhinglaj Police Station) ताब्यात घेतली आहे. त्यामुळे सुसाईड नोटमधील तपशील समोर आल्यानंतर आत्महत्येचे खरं कारण समोर येणार आहे. मात्र, एका उमद्या उद्योगपतीने अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोना काळात संतोष शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपताना परप्रांतीयांना मोठी मदत केली होती. त्यामुळे उद्योगात नाव कमवून सामाजिक योगदान देणाऱ्या एका उद्योगपतीचा अत्यंत वाईट शेवट झाला. (Kolhapur Crime News)

राहत्या घरात केली आत्महत्या

शनिवारी सकाळी संतोष शिंदे यांच्या बेडरुमचे दार न उघडल्याने त्यांच्या आईने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी तिघांचे मृतदेह आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची सुसाईड नोट सापडली आहे. तसेच त्यांच्या मानेवर जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांनी अगोदर विष प्राशन केले त्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून आत्महत्या केली.

गुन्ह्यात तुरुंगात जावे लागले होते

महिन्यापूर्वी त्यांच्यावर बलात्काराचा (Rape Case) गुन्हा दाखल (FIR) झाला होता. त्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले होते. तेव्हापासून ते ताणतणावात होते. जामिनावर जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न ते करत होते. मात्र मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा घटनास्थळी आहे.

परराज्यात उद्योगाचा विस्तार केला

संतोष शिंदे यांनी अगदी लहान वयातच जिद्दीने मोठी भरारी घेतली होती. अर्जुन उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी खाद्यतेलाचे उत्पादन आणि ‘विराज फुडस’च्या बेकरी उत्पादने सुरु केली होती. तसेच अत्याधुनिक व्यायामशाळाही सुरु केली होती. मुंबई, कोकणसह कर्नाटकामध्येही त्यांनी उद्योगाचा विस्तार केला होता. त्यांच्या पश्चात आई, विवाहित बहिण असा परिवार आहे.

Web Title : Kolhapur Crime News | Arjun Udyog Group Santosh Shinde Ended Life With His Family Gadhinglaj Kolhapur Suicide Case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा