Kolhapur Crime News | धक्कादायक ! महिला पोलिसाकडून  वयोवृद्ध सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; कोल्हापूरमधील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime News | कसबा बावडा (Kasba Bawda) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात सोमवारी मध्यरात्री  महिला पोलीस हवालदाराने वयोवृद्ध सासूवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ८० वर्षीय सासू गंभीर जखमी झाली असून आशालता श्रीपती वराळे (Ashalta Shripati Varale) असं त्यांचा नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार (Private Hospital) सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांनी जखमी सासूचा जवाब  नोंदवून घेतला असून त्यानुसार पोलीस असलेल्या सुनेवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा कोल्हापूर (Kolhapur) येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Thane) दाखल केला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी कि, आशालता वराळे या आपला मुलगा आणि सून यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात वास्तव्याला आहेत. सून संगीता राजेंद्र वराळे (Sangeeta Rajendra Varale) (वय ५१ ) या पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. साध्य त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात आहेत. काही दिवसापासून संगीता वराळे  आणि सासू आशालता यांच्यात कौटुंबिक वाद सुरु आहे.  सोमवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला. हा वाद इतका टोकाला गेला कि सासू सुनामध्ये बाचाबाची झाली.

रागाच्या भरात सूनेनं आपल्या सासूवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिलं.
यामध्ये आशालता वराळे गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या तोंडाला, मानेस, उजव्या हात आणि पायाला अनेक ठिकाणी भाजलं आहे.  हि घटना समजताच नातेवाईकांनी आशालता वराळे यांना  त्वरित रुग्णालयात उपचारासाठी हलवलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title :  Kolhapur Crime News | daughter in law set mother in law on fire at midnight in family hassle kolhapur

हे देखील वाचा

Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 13,027 ‘कोरोना’मुक्त, 6,740 नवीन रुग्ण

Pune Crime Branch Police | दरोड्याच्या तयारीत असलेल्या बबन व्यवहारे याच्यासह चौघांना गुन्हे शाखेकडून अटक

12 BJP MLA Suspended | 12 आमदारांच्या निलंबनाने सत्ताधार्‍यांची खुर्ची मजबूत होणार ? जाणून घ्या

SPPU Pune University | पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा