Kolhapur Crime News | बाप होऊ शकलो नाही ! तरुण डाॅक्टरची आत्महत्या; कोल्हापूरमधील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime News | कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये डॉक्टर महेश रामचंद्र तेलवेकर (वय 40 वर्षे) यांनी स्वतःच्याच दवाखान्यात आत्महत्या केली आहे. तरुण डॉक्टराच्या आत्महत्येमुळे मुरगूड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी 12 मार्च रोजी हि घटना उघडकीस आली आहे. मृत डॉक्टर महेश रामचंद्र तेलवेकर यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईट नोटदेखील लिहिली आहे. (Kolhapur Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?

डॉक्टर महेश रामचंद्र तेलवेकर यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये, असा उल्लेख केला आहे. तसेच “मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मी चांगला बाप होऊ शकलो नाही, मी कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही, मी काही कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये,” असे लिहिले आहे. मृत महेश हे मूळचे नाणीबाई चिखली (ता. कागल) येथील आहेत. ते मागच्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबीयांसह मुरगूडमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुरगुड बाजारपेठेत ‘ओम क्लिनिक’ नावाने दवाखाना सुरु केला होता.

मृत महेश यांनी दवाखान्याच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या
केली आहे. या प्रकरणी शिवाजी कुंभार यांनी मुरगूड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
महेश मागच्या 10 वर्षांपासून गावामध्ये वैद्यकीय व्यवसाय करत होते.
मागच्या दोन वर्षांपासून त्यांनी मुरगुडमध्ये स्टॅन्ड परिसरात ‘ओम क्लिनिक’ नावाने दवाखाना सुरु केला होता.
कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. पण मागच्या काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते.
यामधूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Web Title :- Kolhapur Crime News | in murgud kagal taluka 40 years old doctor ended his life kolhapur crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime News | म्हशीचा धक्का लागल्याने विहिरीत पडून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू; कोल्हापूरमधील घटना

Subsidy For Onion | शेतकर्‍यांना दिलासा ! कांद्याला प्रतिक्विंटल 300 रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Beed Accident News | वाहनाने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या 70 वर्षीय आईचा मृत्यू

Oscar Awards 2023 | मिशेल योह ठरली उत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पटकावणारी आशियातील पहिली महिला