Kolhapur Crime News | उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण, माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकाऱ्याला सोलापूरातून घेतलं ताब्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime News | कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समूहाचे प्रमुख (Arjuna Group) संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह आत्महत्या (Santosh Shinde Suicide Case) केल्याने खळबळ उडाली आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा झालेला प्रयत्न, त्यानंतर माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकाऱ्याने (Police Officer) खंडणीसाठी (Extortion) केलेल्या मानसिक छळामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून (Kolhapur Crime News) ठेवली आहे. सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) नावे असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) संतोष शिंदे यांनी सुसाईड नोटमध्ये नावे लिहिलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पाच पथके तयार केली होती. कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकाऱ्याला सोलापूर (Solapur) येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. त्यांची सध्या चौकशी सुरु आहे. संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याचे नाव असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Kolhapur Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार खंडणीच्या त्रासाला कंटाळून संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहीलेल्या चिठ्ठीत चार जणांची नावे आढळून आली होती. त्यामध्ये माजी नगरसेविका (Ex-Corporator), पोलीस अधिकारी आणि पुण्यातील दोन उद्योजकांची (Pune Entrepreneurs) नावे होती. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्या नोटमध्ये म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी पाच पथके रवाना केली होती.

दरम्यान, ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी ही माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकारी गडहिंग्लज येथून फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. अखेर ते दोघे सोलापूर येथील एका हॉटेलमध्ये सापडले. पुण्यातील दोघांचा अद्यापही पोलीस शोध घेत आहेत.

संतोष शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा आरोप (Rape Case) करण्यात आला होता.
त्या आरोपामध्ये त्यांना एक महिना तुरुंगात जावे लागले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते खूपच तणावामध्ये होते.
या परिस्थितीत देखील त्यांनी पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक त्यांनी टोकाचे पाऊल उचलत कुटुंबासह जीवन संपवले.

Web Title : Kolhapur Crime News | santosh shinde death case accused former corporator and police officer detained in solapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा